Inside Photos: 24 वर्षीय क्रिकेटपटूचं 16.5 कोटींचं घर पहिलं का? IPL च्या पैशातून मुंबईत घर खरेदी

24 Year Old Indian Player New Mumbai Home Inside Photos: मुंबईमध्येच क्रिकेटचे धडे गिरवत मोठ्या झालेल्या या 24 वर्षीय क्रिकेटपटूने 2 वर्षांपूर्वी म्हणजेच वयाच्या 22 व्या वर्षी इंडियन प्रिमिअर लिगसाठी मिळालेली कोट्यवधी रुपयांची रक्कम थेट घरामध्ये गुंतवली होती. तब्बल 2 वर्ष या घराचं काम सुरु होतं आणि अखेर आता 2024 चं आयपीएल सुरु असतानाच त्याला नव्या घराचा ताबा मिळाला आहे. पाहूयात त्याच्या घरातील खास फोटो...

| Apr 11, 2024, 11:57 AM IST
1/13

Prithvi Shaw New Mumbai Home Inside Photos

सध्या सुरु असलेल्या इंडियन प्रिमिअर लीगच्या 17 व्या पर्वामध्ये चर्चेत असलेल्या खेळाडूंपैकी एक म्हणजे दिल्ली कॅपिटल्सच्या संघातील सलामीवीर पृथ्वी शॉ!   

2/13

Prithvi Shaw New Mumbai Home Inside Photos

यंदाच्या पर्वात पृथ्वीला अद्याप आपल्या नावाला साजेशी खेळी करता आलेली नाही.  

3/13

Prithvi Shaw New Mumbai Home Inside Photos

संघाच्या पहिल्या 3 सामन्यामध्ये पृथ्वीला एकूण 119 धावाच करता आल्या असून आतापर्यंत त्याची सर्वाधिक धावसंख्या 66 ठरली आहे.

4/13

Prithvi Shaw New Mumbai Home Inside Photos

मैदानावर फारशी मेमोरेबल कामगिरी नसली तर पृथ्वीच्या आयुष्यातील एक मोठं स्वप्न नुकतेच पूर्ण झालं आहे. हे स्वप्न म्हणजे स्वत:चं एक घर असण्याचं.  

5/13

Prithvi Shaw New Mumbai Home Inside Photos

मुंबईतील वांद्रे येथील आलिशान इमारतीमध्ये पृथ्वीने विकत घेतलेल्या घराच्या इंटिरिअरचं काम नुकतेच पूर्ण झाले असून पृथ्वी तिथं राहायला गेला आहे.  

6/13

Prithvi Shaw New Mumbai Home Inside Photos

वयाच्या 22 व्या वर्षी पृथ्वीला दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने आयपीएल 2022 च्या पर्वामध्ये 7.5 कोटी रुपये मोजून संघात कायम ठेवलं होतं. 

7/13

Prithvi Shaw New Mumbai Home Inside Photos

आयपीएल मधून मिळालेल्या या साडेसात कोटींमध्ये आणखीन 9 कोटींची भर घालून पृथ्वीने 16.5 कोटींचं आलीशान घर मुंबईत विकत घेतलं.   

8/13

Prithvi Shaw New Mumbai Home Inside Photos

वांद्र्यातील के. सी. रोडवर असलेल्या इमारतीमधील पृथ्वीच्या या घराला 1654 स्वेअर फुटांची मोठी ओपन टेरेस आहे.  

9/13

Prithvi Shaw New Mumbai Home Inside Photos

24 वर्षीय पृथ्वीनेच या घरातील काही फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केली आहे.   

10/13

Prithvi Shaw New Mumbai Home Inside Photos

पृथ्वीच्या या घराचा एकूण एरिया 2209 स्वेअर फुटांचा आहे.  

11/13

Prithvi Shaw New Mumbai Home Inside Photos

2022 पासून या घराच्या इंटिरिअरचं काम सुरु होतं. आता आपल्याला घराचा ताबा मिळाल्याचं पृथ्वीने घरातील फोटो शेअर करत सांगितलं आहे. थॉमस परम्बिल आर्किटेक्ट अॅण्ड व्हेटर्न्स इंटिरिअर कंपनीने त्याच्या घरातील इंटिरिअरचं काम केलं आहे.  

12/13

Prithvi Shaw New Mumbai Home Inside Photos

मोठ्या घराचं स्वप्न पाहण्यापासून ते प्रत्यक्षात जगण्यापर्यंतचा प्रवास खरोखरच अविस्मरणीय होता, असं पृथ्वीने फोटो शेअर करताना म्हटलं आहे.  

13/13

Prithvi Shaw New Mumbai Home Inside Photos

हा माझा स्वत:चा छोटासा स्वर्ग आहे, असंही पृथ्वीने नव्या घरातील फोटो शेअर करताना म्हटलं आहे.