217 वर्ष जुनं मुंबईतील बाबुलनाथ मंदिर; एका गुराख्याने दिले मंदिराला नाव, जाणून घ्या पूर्ण इतिहास

बाबुलनाथ मंदिर हे मुंबईतील सर्वात प्राचीन शिवायल आहे. हे प्राचीन शिवमंदिर म्हणजे मुंबईचा ऐतिहासिक वारसा आहे. 

Aug 20, 2023, 20:53 PM IST

Mumbai Babulnath Temple :  बाबुलनाथ मंदिर हे मुंबईतील प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. 18 व्या शतकात या मंदिराची निर्मीती करण्यात आली. मलबाल हिलवर असलेल्या या मंदिरामध्ये जाण्यासाठी पायऱ्या आहेत. प्रवेशद्वार अतिशय भव्य व सुंदर असून नाजूक नक्षीकाम केलेले आहे.  श्रावण महिन्यात भाविक मोठ्या संख्येने येथे दर्शनासाठी येतात. 

1/8

महाराष्ट्र राज्यातील मुंबईमध्ये असलेलं शंकराचं बाबुलनाथ मंदिर हे भारतातील खुप प्रसिद्ध मंदिर आहे.

2/8

या मंदिराविषयी अशी मान्यता आहे की , हे शिवलिंग बाभूळाच्या झाडाच्या सावलीत एका गुराख्याला दिसले होते ,त्यामुळे या मंदिराला बाबुलनाथ हे नाव देण्यात आहे.

3/8

1840 साली शिवलिंगासोबत देवी पार्वती , गणेश , कार्तिक , नागदेवता इत्यादी मूर्त्यांची स्थापना करण्यात आली.

4/8

या मंदिराची स्थापना इ.स. 1806 साली करण्यात आली होती. सुरुवातीला या मंदिरात फक्त शिवलिंगाची स्थापना केलेली होती. 

5/8

हे मंदिर भारतातचं नव्हे तर भारतासह जगभरात प्रसिद्ध आहे.अनेक विदेशी पर्यटकही या मंदिराला भेट देतात.  

6/8

या मंदिरात मराठी शैलीच्या वास्तुकलेचा वापर करून अनेक शिल्प बनवली आहेत. 

7/8

बाबुलनाथ मंदिर मुंबईतील गिरगाव चौपाटीवरील मलबार हिल्स पर्वतरांगेत आहे. या मंदिराच्या बाजूला गोड पाण्याची मोठी नदी आहे.

8/8

पश्चिम रेल्वेवरील ग्रांट रोड किंवा चर्णी रोड या स्थानकावरून बाबूलनाथ मंदिराकडे जाता येते. तसेच CSMT रेल्वे स्थानकातूनही येथे जाता येते.