मारूती सुझुकीची सियाज फेसलिफ्ट झाली लॉन्च

Aug 21, 2018, 09:01 AM IST
1/6

2018 Ciaz Facelift

2018 Ciaz Facelift

मारुती सुझुकी इंडियाची नवी सिडान कार बाजारात लॉन्च झाली आहे. 2018 Ciaz फेसलिफ्टला भारतीय बाजारात लॉन्च करण्यात आलं आहे. दिल्लीत या कारची एक्स शोरूम किंमत 8.19 लाख पासून पुढे आहे. यामध्ये 4 व्हेरिएंट उपलब्ध आहेत. ही कार पेट्रोल आणि डिझेलमध्ये उपलब्ध आहे. 

2/6

2018 Ciaz Facelift

2018 Ciaz Facelift

2018 Ciaz मध्ये अलॉय व्हील्स आहेत. सोबत रियर साइडवर LED लॅम्प आहेत. मागे बम्परमध्येही बदल करण्यात आले आहेत. 10 ऑगस्टपासून या कारची बुकिंग सुरू झाली आहे. या मॉडलला मारुतीच्या  नेक्सा नेटवर्कद्वारा विकले जाणार आहे.   

3/6

2018 Ciaz Facelift

2018 Ciaz Facelift

नव्या सियाज  कारला 1.5 लीटर पेट्रोल इंजिनमध्ये उतरवण्यात आलं आहे. 2018 मारुती सुजुकी सियाज नव्या स्वरूपात आहे. फ्रंट ग्रिलमध्ये क्रोमचा वापर करण्यात आला आहे. फॉग लॅम्पमध्ये हाउसिंग आणि अपडेटेड हेडलॅम्प क्लस्टरचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये  डीआरएल्स लावण्यात आलं आहे. 

4/6

2018 Ciaz Facelift

2018 Ciaz Facelift

इंटीरियरमध्ये फारसे बदल करण्यात आलेले नाही.  स्मार्टफोन कनेक्टिविटीसाठी अ‍ॅपल कारप्ले, एंड्रॉयड ऑटो आणि सुजुकी कनेक्टची सोय देण्यात आली आहे. सोबतच क्रूज कंट्रोल फीचर देण्यात आले आहे.

5/6

2018 Ciaz Facelift

2018 Ciaz Facelift

या कारचं इंंजिन भारतामध्ये बनवण्यात आलं आहे. त्याची मॅक्झिमम पॉवर 103 ब्रेक हॉर्स पॉवर आणि 138 न्यूटन मीटर टार्क जेनरेट करते. मॅनुअल गियर बॉक्स वेरिएंटमधील ही कार 21.56 किलोमीटर पर लीटर मायलेज देते. तर ऑटोमेटिक वेरिएंट  20.28 kmpl माइलेज देते. असा दावा करण्यात आला आहे. 

6/6

2018 Ciaz Facelift

2018 Ciaz Facelift

2018 सियाज फेसलिफ्ट डीजल इंजन  28.09 kmpl मायलेज देते. डीजल इंजन अधिकाधिक 89 ब्रेक हॉर्स पावर आणि 200 न्यूटन मीटर टार्क जेनरेट करू शकते.