10 मिनिटांत तयार होणारे नाश्ताचे 10 प्रकार, पौष्टिक अन् चविष्ट

सकाळच्या नाश्त्याला किेंवा डब्याला रोज रोज काय बनवावं हा प्रश्न कायमचं घरातल्या गृहिणीला सतावत असतो. रोज रोजच्या शिरा आणि पोह्यांना कंटाळात असाल तर झटपट होणारे पौष्टीक 10 साऊथ इंडियन मेन्यू घरी नक्की ट्राय करा. 

Feb 20, 2024, 19:37 PM IST
1/10

रवा डोसा

रवा, तांदळाचं पीठ आणि दही एकत्र करून हा डोसा तयार केला जातो. खाण्यासाठी चविष्ठ असलेल्या या कुरकुरीत डोश्याची लज्जत वाढवण्यासाठी तुम्ही चिरलेला कांदा आणि कोथिंबीर ही घालू शकता.   

2/10

खोबऱ्याची चटणी

ओल्या नारळाच्या चटणी ही दाक्षिणात्य खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. ओलं खोबरं हिरवी मिरची, आलं ,कोथिंबीर यांचे मिश्रण एकत्र करून वाटण केलं जातं.या वाटणात उडीद डाळ, मोहरी आणि कडीपत्त्याची फोडणी दिली जाते. ही खोबऱ्याची चटणी तुम्ही नुसत्या भातासोबतही खाऊ शकता.   

3/10

लेमन राईस

खिचडी आणि वरण भात खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही लेमन राईस ट्राय करू शकता. मोहरी, चणा डाळ, उडीद डाळ, शेंगदाणे आणि कढीपत्त्याची भाताला फोडणी देऊन त्यात भात शिजला की, वरून लिंबाचा रस , हळद आणि किसलेलं खोबरं टाकून सर्व्ह करू शकता. 

4/10

मुगाचा डोसा

दाक्षिणात्य भाषेत मुगाच्या डोश्याला पेसरट्टू असं म्हटलं जातं. जसं महाराष्ट्रात धिरडं केलं जातं तसचं दाक्षिणात्य भागात पेसरट्टू  हा प्रकार लोकप्रिय आहे. मुगाच्या डाळीच्या पिठात हिरवी मिरची, आलं आणि जीरं एकत्र करून या मिश्रणाचा पातळ डोसा तयार करण्यात येतो. हा खायला स्वादिष्ट असून लवकर तयार होतो. 

5/10

टोमॅटो रस्सम

रस्सम हा दाक्षिणात्य भागातील प्रसिद्ध असा खाद्यपदार्थ आहे. टोमॅटो प्युरी, चिंचेची पेस्ट आणि मसाले एकत्र करून टोमॅटो सुपसारखं बनवलं जातं. हा झणझणीत रस्सम भातासोबतही सर्व्ह करता येतो. 

6/10

दही भात

महाराष्ट्रात दही भात खाण्याचं प्रमाण जास्त असलं तरी दाक्षिणात्य भागात दही भात बनविण्याची पद्धत वेगळी आहे. दह्याला  मोहरी, उडीद डाळ, हिरवी मिरची, आले आणि कढीपत्त्याची फोडणी दिली जाते. त्यात चवीपुरतं मीठ आणि तुप टाकून हा दही भात सर्व्ह केला जातो. 

7/10

कांदा टोमॅटो चटणी

खोबऱ्याच्या चटणीसोबतच कांदा टोमॅटो चटणी देखील तितकीच लोकप्रिय आहे. कांदा ,टोमॅटो, लाल मिरची, चिंच  तेलामध्ये फ्राय करून या मिश्रणाची चटणी तयार केली जाते. ही चटणी इडली आणि डोश्यासोबत ही सर्व्ह करता येते.   

8/10

उपमा

उपमा बनविण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. कमी वेळात दाक्षिणात्य पद्धतीने उपमा बनविणं अगदी सोपं आहे. भाजलेल्या रव्यामध्ये मोहरी, उडीदडाळ आणि कढीपत्ताची फोडणी दिली जाते, त्याशिवाय आवडीच्या भाज्या घालून तुम्ही हे सर्व्ह करू शकता. 

9/10

झटपट सांबार

दाक्षिणात्य भागात सांभार या पदार्थाला विशेष महत्त्व आहे. मोहरी, मेथी दाणे आणि हिंग यांची फोडणी देऊन आवडीच्या भाज्या,डाळ आणि मसाले आणि चिंचेचा अर्क हे मिश्रण एकत्र करून शिजवले जाते.    

10/10

थिनाई उत्तप्पम

हा डोश्यासारखा असला तरी थिनाई उत्तप्पम बनविण्याची पद्धत वेगळी आहे. रात्रभर भिजवलेली बाजरी बारीक वाटून भाज्या,मसाले आणि कढीपत्ता एकत्र करून हे मिश्रण तेलात फ्राय करून सर्व्ह करता येते.