मंत्री, खासदार, आमदार कुणीही असो गावात आला की त्याच्यावर कांदा फेकायचा; ग्रामस्थांचा अजब निर्णय

नाशिकच्या मुंजवाड गावच्या कांदा उत्पादकांनी केली राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. कांद्याला भाव मिळत नसल्यामुळे गावात लावले गावबंदीचे फलक लावले आहेत. 

वनिता कांबळे | Updated: May 21, 2023, 05:56 PM IST
मंत्री, खासदार, आमदार कुणीही असो गावात आला की त्याच्यावर कांदा फेकायचा; ग्रामस्थांचा अजब निर्णय title=

Nashik Farmer News :  अवकाळी पाऊस आणि लहरी हवामानाचा फटका यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सध्या शेतकरी मोठ्या संकटाचा सामना करत आहे. अधिकारी आणि राजकीय नेते आणि नुकसानग्रस्त शेतीची फक्त पाहणी करुन जातात. सरकारकडून फक्त मदतीचे आश्वासन दिले जाते. प्रत्यक्षात मदत काहीच मिळत नाही. यामुळे शेतकरी संतापले आहेत. शेतकऱ्यांनी राजकीय नेत्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मंत्री, खासदार, आमदार कुणीही असो गावात आला की त्याच्यावर कांदे फेकायचे. नाशिकमधील (Nashik) ग्रामस्थांनी हा अजब निर्णय घेतला आहे.   

सटाण्याच्या मुंजवाडमध्ये राजकीय नेत्यांना गावबंदी

शेतकऱ्यांचे वार्षिक आर्थिक गणित अवलंबून असलेल्या कांदा कवडीमोल भावात विकला जात आहे. यामुले नाशिकच्या सटाणा तालुक्यातील मुंजवाड गावाच्या कांदा उत्पादक शेतकरी आणि शेतकरी क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आमदार, खासदार, मंत्री तसेच राजकीय पक्षांच्या नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेला आहे.

राजकीय नेते व लोकप्रतिनिधींवर कांदा फेकून निषेध करण्याचा ठराव 

राजकीय पक्षांच्या नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णयाची योग्य अंमलबजावणी व्हावी यासाठी तसा ठराव देखील करण्यात आला आहे. गावात प्रवेश करणाऱ्या राजकीय नेते व लोकप्रतिनिधींवर कांदा फेकून निषेध करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात  आला आहे. तसे फलक गावाच्या चारही बाजूने लावण्यात आले आहेत. कांदप्रश्नी निष्क्रिय ठरलेल्या राजकीय पुढारी, प्रतिनिधी यांनी शासनाला जाब विचारावा यासाठी या निर्णय घेण्यात आला आहे.

कांदा चाळीत युरीया टाकला

नाशिकच्या कळवण तालुक्यातील रवळजी गावात अडीच हजार क्विंटल कांदा वाया गेला होता. अज्ञात समाजकंटकाने रात्रीच्या वेळी या कांदा चाळीत युरीया टाकला होता. त्यामुळे अडीच हजार क्विंटल कांदा पुर्णपणे खराब झाला होता. नर्मदाबाई शिंदे यांनी चांगला भाव मिळेल या अपेक्षेने कांदा शेतात साठवून ठेवला होता. मात्र, आता लाखो रुपयांचं नुकसान झाले आहे. तात्काळ पंचनामा करुन पोलिसांनी या समाज कंटकाला कठोर शासन करावं अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी करत आहेत.

शेतक-याने कांद्याच्या ढिगावर मेंढ्या चरायला सोडल्या

पुण्याच्या भोर तालुक्यातील खानापूर गावात शेतक-याने कांद्याच्या ढिगावर मेंढ्या चरायला सोडल्या होत्या. या शेतक-याने 70 पिशवी कांदा शेतात काढून ठेवला होता. मात्र, अवकाळी पावसानं कांदा भिजल्यानं संपुर्ण कांदा खराब झालाय. त्यामुळे शेतक-याने हा कांदा मेंढ्यांपुढे टाकला होता.