गेल्या काही दिवसांपासून भारत-पाक सीमेवर पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात गोळीबार होत आहे. गेल्या चार वर्षात हे प्रमाण वाढलेले असून दुसरीकडे अरूणाचल प्रदेश आणि लडाख या भागातून चीनी घुसखोरीही चालू आहे. या पार्श्वभूमीवर भारताने शस्त्रसिद्धतेसाठी अनेक महत्त्वाची पाऊले टाकणे गरजेचे आहे. मोदी सरकारने या दृष्टीने चांगली सुरूवात केली आहे. गरज आहे ती चांगल्या अंमलबजावणीची.
धगधगती एलओसी नुकसान दोनी देशांचे
गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमधील भारत-पाक सीमारेषेवर (एलओसी) भारत आणि पाकिस्तान सैन्यामध्ये प्रचंड प्रमाणात गोळीबार सुरू आहे. यामध्ये अनेक नागरिक मारले गेलेले आहेत आणि आपले अनेक जवान शहिद झालेले आहेत. सध्या उपलब्ध झालेल्या आकडेवारीप्रमाणे गेल्या काही दिवसात झालेल्या गोळीबारात आपले तीन जवान, तीन नागरिक आणि दोन दहशतवादी मारले गेलेले आहेत.
गेल्या चार वर्षांचा इतिहास बघितला तर भारत-पाक सीमेवर जो गोळीबार होत आहे, त्यापैकी २०११ मध्ये ६५ वेळा गोळीबार झाला, २०१२ मध्ये ११४ वेळा गोळीबार झाला, तर २०१३ मध्ये हे प्रमाण प्रचंड वाढून ३४७ वेळा गोळीबार झाला. यावर्षी आतापर्यंत ७५ पैक्षा जास्तवेळा पाकिस्तानने भारताच्या सीमेवर गोळीबार केलेला आहे. हा गोळीबार पाकिस्तान का करते हा प्रश्न सामान्य जनांच्या मनात निर्माण होणे स्वाभाविक आहे.
गोळीबार हिंदू बहुल भागात
या गोळीबाराचा आणि भारतामध्ये दहशतवादी पाठविण्याचा घनिष्ठ संबंध आहे. गेल्या चार वर्षांचा इतिहास बघता २०११ मध्ये २४७ वेळा घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला गेला. हा आकडा २०१२ मध्ये २६४ होता. तर २०१३ मध्ये हा आकडा वाढून २७७ वर पोहोचला आणि २०१४ मध्ये आत्तापर्यंत पाकिस्तानने दहशतवाद्याना ५० हून जास्त वेळा घुसखोरी करण्यासाठी प्रयत्न केला आहे. या गोळीबारामुळे त्या भागात राहणार्या नागरिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. यामध्ये त्यांची घरे बरबाद होतात. त्यांना शेती किंवा आपला कामधंदा करता येत नाही.
याशिवाय त्यांची जनावरेसुद्धा मारली जातात. सध्या पाकिस्तान या भागात मॉर्टर्सचे फायरिंग करत आहे. याचा पल्ला सहा ते सात किलोमीटर पर्यंत असतो. या गोळीबारामुळे सीमावर्ती भागातील जनता आता तेथून हलून जवळजवळ दहा किलोमीटर मागे गेलेली आहे. हा गोळीबार जम्मूच्या भागात होत आहे. जम्मूच्या या सीमावर्ती भागात हिंदूंची संख्या जास्त आहे हे लक्षात घेतले पाहिजे. हाच गोळीबार काश्मीर खोऱ्यात झाला असता तर तेथे शंभरटक्के मुस्लिम लोक आहेत. म्हणून हा गोळीबार मुद्दामच पाकिस्तानी सैनिक जम्मूच्या सीमावर्ती भागात करत आहेत.
या गोळीबारामुळे पाकिस्तानलाही मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. कारण आपले सैन्य त्यांच्या गोळीबाराला चांगले उत्तर देत आहे आणि यामुळे पाकिस्तानचे सुद्धा अनेक जवान मारले गेलेले आहेत. तसेच त्यांच्यासुद्धा सीमावर्ती भागात असलेल्या नागरिकांनी तेथून हलून मागच्या भागात स्थलांतरीत होणे सूरू केलेले आहे. यामुळे त्यांचे नुकसान केल्याचा आपल्याला आनंद मिळतो पण दुसरीकडे आपल्या सामान्य माणसाचेदेखील नुकसान होत आहे.
पाकिस्तान प्रेमीचा उपदेश
२७/०८/२०१४ला भारत आणि सैन्याधिकार्यांनी यावर बोलून सुरू असलेला हा गोळीबार बंद करण्याचा प्रयत्न केला आहे. पण हा गोळीबार अजून किती दिवस चालेल हे सांगता येत नाही. जे पाकिस्तानप्रेमी भारतात आहेत, त्यांनी या फायरिंगमुळे आपल्या सरकारला उपदेश करायला सुरूवात केलेली आहे की, आपण परराष्ट्र पातळीवर जी चर्चा होणार होती. ती थांबविल्यामुळे रागवून पाकिस्तानने आपल्यावर गोळीबार सुरू केला आहे.
तसेच जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमार अब्दुल्ला यांनीदेखील म्हटले आहे की, भारताला जर पाकिस्तानकडून होणारा हा गोळीबार थांबवायचा असेल तर भारताने लवकरात लवकर पाकिस्तानशी शांततेचा वार्तालाप सुरू करायला पाहिजे. या बद्दल एक ठराव पण जम्मू-काश्मीर विधनसभेने २७/०८/२०१४ ला पास केला आहे.
अर्थातच पाकिस्तानप्रेमी भारतीय आणि जम्मू-कश्मीरच्या मुख्यमंत्र्यांचे म्हणणे चुकीचे आहे. ते केवळ राष्ट्र्विरोधीचे तुश्टिकरण करत आहे. पाकिस्तानच्या गोळीबारामुळे आपण त्यांच्याशी शांतता चर्चा कधीही सुरू करू शकत नाही. पण अशा प्रकारचा गोळीबार सुरू राहिला तर आणि याचे रुपांतर छोट्या युद्धात किंवा मोठ्या युद्धात झाले तर अशा वेळी आपली शस्त्रक्षमता किती आहे, याचा विचार करणे गरजेचे आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.