www.24taas.com, झी मीडिया, सॅन फ्रान्सिस्को
ट्विटरवर उगाचच ‘टिव टिव’ करणाऱ्यांची तोंड बंद करण्याची इच्छा तुम्हाला अनेकदा झाली असेल... पण, आता जर तुम्हाला असं वाटलं तर तुम्ही हे बिनधास्त आणि अगदी सोप्या पद्धतीनं करू शकाल. कारण, ट्विटरनं आपल्या यूजर्ससाठी नको असणाऱ्या मॅसेजेसवर बंदी घालण्यासाठी ‘म्यूट पोस्ट’ नावानं नवीन फिचर सुरू केलंय.
येणाऱ्या काही आठवड्यांत हेच फिचर सगळ्या ट्विटर अकाऊंटवर सुरु करण्यात येणार आहे. `ट्विटर`चे निर्मिती व्यवस्थापक पॉल रोसानिया यांनी ब्लॉगवरून याबाबत माहिती दिलीय.
एखाद्या खातेदारकाकडून सतत पोस्ट येत असल्यास अनेकदा नेटिझन्सला त्रासाला सामोरे जावे लागते. मात्र, यापुढे ‘म्यूट बटन` दाबल्यास त्यापासून सुटका होणार आहे. खातेदाराला हवे तेव्हा ‘अन म्यूट बटन`द्वारे सुरू करू शकतो. आयफोन, अँड्रॉइड अॅप्लिकेशन असणारे मोबाईल व संगणकावरील विविध ब्राउजरमधून वापर करता येणार आहे. थोडक्यालत, रिमोट कंट्रोलच तुमच्या हातात दिल्याचं रोसानिया यांनी सांगितलंय.
ज्या लोकांना तुम्ही म्यूट केलंय त्यांना मात्र हे समजणार नाही की तुम्ही त्यांना म्यूट केलंय. तुम्ही तुम्हाला हवं तेव्हा त्यांना अनम्यूट करू शकाल. वेबसाईटसोबत हे फिचर तुम्हाला तुमच्या आयफोन आणि अँन्ड्रॉईड अॅप्लिकेशनवरही उपलब्ध करून दिलं गेलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.