मुंबई : भारताच्या स्मार्टफोन मार्केटवर अधिराज्य गाजवणाऱ्या सॅमसंगसाठी एक मोठा धक्का चीनच्या शाओमी कंपनीने दिला आहे.
शाओमी कंपनीने भारतात पहिला स्मार्टफोन 'मी-3' लॉन्च केला आहे. भारतात 22 जुलैपासून हा फोन फ्लिपकार्डच्या माध्यमातून विकला जाणार आहे. सध्या या फोनची बुकिंग सुरू करण्यात आली आहे.
शाओमीचे अध्यक्ष बिन लिन यांनी म्हटलंय, 'मी-3' हा बाजारात उपलब्ध असलेल्या कोणत्याही फोनपेक्षा 30 टक्के अधिक वेगाने काम करतो, आम्ही भारतात पहिल्यांदा सर्वोत्तम फोन घेऊन आलोय.
स्नॅपड्रॅगन ऑक्टाकोर प्रोससर आणि दोन जीबी रॅम या फोनमध्ये आहे, तसेच या फोनमध्ये दमदार हार्डवेअर लावण्यात आले आहेत.
'मी-3' ची किंमत 13 हजार 999 रूपये ठेवण्यात आली आहे. 'मी-3' भारतीय बाजारात 14 हजारापर्यंत येईल, असं सांगण्यात आलं होतं, पण त्याची किंमत आणखी हजार रूपये कमी झाली आहे.
'फ्लिपकार्ट'चे सीईओ सचिन बन्सल यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा फोन असा आहे की, यामुळे चीनच्या उत्पादनाकडे लोकांच्या पाहण्याचा दृष्टीकोन निश्चित बदलेल.
फीचर्स & हार्डवेअर |
मी-3 शाओमी |
सॅमसंग एस 5 |
---|---|---|
प्रोसेसर |
स्नॅपड्रॅगन ऑक्टाकोर 2.3 GHz |
एडोनिस प्राइम 2 , (क्वाड 1.9 GHz + क्वाड 1.3 GHz) |
रॅम |
2 जीबी |
2 जीबी |
ऑपरेटिंग -सिस्टम |
एंड्राएड 4.4 वरएमआययूआरआय इंटरफेस |
एंड्राएड 4.4 |
मेमरी |
16 जीबी ( कार्ड स्लॉट नाही) |
16.32 जीबी (128 जीबीपर्यंत एक्सटर्नल कार्ड) |
प्रायमरी कॅमेरा |
13 मेगापिक्सेल, सोनी सेंसर लेन्स, 1080 पी एचडी व्हिडीओ |
16 मेगापिक्सेल, सोनी सेन्सर लेन्स, 2160 पी एचडी व्हिडीओ |
बॅक कॅमेरा |
2 मेगापिक्सेल |
2 मेगापिक्सेल |
ग्राफिक्स |
330 एड्रीनो |
330 एड्रीनो |
स्क्रीन |
5 इंच एचडी आयपीएस |
5 इंच ऐमोलेड, गोरिल्ला ग्लास 3 |
नेटवर्क |
3 जी |
3 जी, 4 जी |
बॅटरी |
3050 एमएएच |
2800 एमएएच |
किंमत |
किंमत 14 हजार |
36 हजार ( 16 जीबी) |
|
|
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.