श्याओमीचा नोट आज भारतात होणार लॉन्च!

चीनची मोबाईल कंपनी श्याओमीच्या ५.५ इंचचा स्मार्टफोन ‘रेडमी नोट’ आज भारतात लॉन्च होणार आहे. कंपनीनं यापूर्वी 'Redmi-1S' आणि Mi-3' लॉन्च केलेले आहेत. ज्यांना ग्राहकांची चांगलीच पसंत मिळाली. ‘रेडमी नोट’ला श्याओमी फॅबलेट कॅटेगरीमध्ये लॉन्च करणार आहे. याची किंमत जवळपास १० हजार रुपयांपर्यंत असेलं. 

Updated: Nov 24, 2014, 05:48 PM IST
श्याओमीचा नोट आज भारतात होणार लॉन्च! title=

नवी दिल्ली: चीनची मोबाईल कंपनी श्याओमीच्या ५.५ इंचचा स्मार्टफोन ‘रेडमी नोट’ आज भारतात लॉन्च होणार आहे. कंपनीनं यापूर्वी 'Redmi-1S' आणि Mi-3' लॉन्च केलेले आहेत. ज्यांना ग्राहकांची चांगलीच पसंत मिळाली. ‘रेडमी नोट’ला श्याओमी फॅबलेट कॅटेगरीमध्ये लॉन्च करणार आहे. याची किंमत जवळपास १० हजार रुपयांपर्यंत असेलं. 

ड्युअल सिम सपोर्टसह ‘रेडमी नोट’मध्ये १.७ गीगाहर्ट्ज ऑक्टा कोर प्रोसेसर आहे. शिवाय २ जीबी रॅम सुद्धा आहे. श्याओमी नोटमध्ये इंटरनल मेमरी ८ जीबी आहे ज्याला ३२ जीबीपर्यंत वाढवता येवू शकतं. 

श्याओमीचं हे गिफ्टच म्हणावं लागेल अवघ्या ९९९९ रुपये किमतीत रेडमी नोट लिस्टेड आहे. यात १३ मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा आहे तर ५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. श्याओमीचा हा फोन अँड्रॉईड ४.३ जेलीबीनवर आधारित आहे. कंपनीनं आपला शानदार फॅबलेट रेडमी नोटला इ-कॉमर्स साइटवर लिस्टेड केलंय.

Redmi Note चे फीचर्स: 

> Redmi Note मध्ये ५.५ इंचचा 720x1280 पिक्सेल एलसीडी डिस्प्ले आहे
> 1.7GHz चं ऑक्टाकोर मीडियाटेक MTK6592 SoC प्रोसेसर
>  Redmi Note मध्ये 2GB रॅम आहे
> हा स्मार्टफोन अँड्रॉइड ४.३ जेलीबीन ऑपरेटिंग सिस्टमला सपोर्ट करते
> यात १३ मेगापिक्सेल रिअर ऑटोफोकस कॅमेरा आहे तर ५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
> Redmi Note मध्ये 8GB ची इंटरनल मेमरी आहे, ज्याला माइक्रो एसडी कार्डद्वारे 32GBपर्यंत वाढवता येतं
> सोबतच Redmi Note 3G आणि 4G व्हॅरियंट कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करेल

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.