मुंबई : चीनची कंपनी Xiaomi ने त्यांचा नवा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Xiaomi Mi Note 2 हा स्मार्टफोन आज लॉन् करण्यात आला. या स्मार्टफोनचा डिस्प्ले Samsung Galaxy S7 प्रमाणे डुअल एज कर्व्ड डिस्प्ले असणार आहे अशी चर्चा आहे. 4GB आणि 6GB चे वेरिऐंटमध्ये हा उपलब्ध झाला आहे.
Xiaomi Mi Note 2 चे फीचर्स
२१ ऑक्टोबरला Xiaomi ने ट्विट करत माहिती दिली होती की, 'Mi Note हॅज बिन कर्व्ड टू इम्प्रेस' यावरुन हे स्पष्ट झालं होतं की हा डुअल एस कर्व्ड डिस्प्ले असणारा स्मार्टफोन असणार आहे.
Samsung Galaxy S6 एज आणि Samsung Galaxy S7 मध्ये हा डिस्प्ले होता.
या हँडसेटमध्ये ५.७ इंचाची सुपर AMOLED(1440×2560 पिक्सेल) डिस्प्ले असणार आहे. जो फोर्स टच टेक्नोलॉजीसोबत असणार आहे.
फोर्स टच (3D टच) ही टेक्नोलॉजी iPhone 6S प्रमाणे असणार आहे. Xiaomi Mi Note 2 मध्ये 64-बिट स्नॅपड्रॅगन 821 क्वाड-कोर प्रोसेसर दिलं गेलं आहे. ग्राफिक्ससाठी एड्रीनो ५३० जीपीयु देण्यात आलं आहे.
स्मार्टफोनमध्ये 4 GB RAM/64 GB जीबी स्टोरेज, 6 GB RAM/128 GB स्टोरेज वेरिएंट असणार आहे.
Xiaomi Mi Note 2 ची किंमत भारतात जवळपास ४०,००० रुपये असण्याची शक्यता आहे.