वॉशिंग्टन : महिंद्राने जगातील पहिली ई स्कूटर लॉंच केली आहे. या बाईकची नाव आहे महिंद्रा जेनजे २.०. महिंद्राने यूएसमधील मार्केटमध्ये ही बाईक उतविली आहे. या स्कूटरची संकल्पना सिलिकॉन व्हॅलीत साकरण्यात आली.
काय आहे या स्कूटरची वैशिष्ट्य
- जेनजे २.० (GenZn2.0)मध्ये बदलता येणारी लिथिअम ऑयन बॅटली बसविण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही स्टॅंडर्ड इलेक्ट्रिक आऊटलेटवर रिचार्ज करता येऊ शकते.
- ही स्कूटर एटीएंडटी नेटवर्कच्या मदतीने इंटरनेट कनेक्टेड आहे. यात इंटरनेट ऑफ थिंग्स मॅथेडोलॉजीचा प्रयोग केला गेलाय. ही स्कूटर चालवताना ट्रॅफिक, हवामानाची माहिती यूजरच्या स्मार्टफोनवर रियलटाइमनुसार डिस्प्ले होत राहील.
या स्कूटरची किंमत १.९५ लाख रुपये आहे. या बाईकचा वेग ५० किमी प्रति तास आहे. या बाईकवर जास्त वजनाचे सामान घेऊन जाऊ शकत नाही. या बाईकची बॅटरी एकदा फुल चार्ज केली तर ३.५ तास ५० किमी अंतर पार करेल.