मुंबई : तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी अनेक लोक पाण्यामध्ये पैसे फेकताना दिसतील... पण असं का करतात बरं... पण यामागचं खरं कारण किती लोकांना माहीत आहे, हा प्रश्नच आहे.
यामागचं खरं कारण ज्यांना ज्यांना माहीत आहे ते लोक कागदी नोटा फेकणार नाहीत, हे मात्र नक्की...
पूर्वीच्या काळी रेल्वेतून प्रवास करताना एखाद्या नदीवरून प्रवास करताना आपली आई-आजोबा आपल्या हातात हमखास एखादा कॉईन द्यायचे.... पाण्यात फेकण्यासाठी... पण, ते असं का करत असावेत बरं...
पूर्वीच्या काळी पैसे नद्या, विशिंग वेल यांमध्ये फेकणं नशिबवान होण्याचा मार्ग मानला जात होता. पण, तुम्हाला माहीत आहे का की पूर्वीच्या काळी कॉपर म्हणजेच तांब्याची नाणी बनवली जायची... आजच्यासारखी स्टीलची नाहीत...
कॉपर पाण्यात टाकल्यामुळे ते तुरटीसारखं काम करतात... त्यामुळे पाण्यात असलेला कचरा पाण्याखाली बसतो... त्यामुळे स्वच्छ पाणी पिण्यासाठी उपलब्ध होतं. तसंच कॉपर आपल्या शरीरासाठीही उपयोगी ठरतं... त्यामुळेच ही प्रथा पडली असावी.