फुकटातल्या वायफायवर काय पाहतात पुणेकर?

गुगल आणि रेल्वेनं भारतातल्या 19 रेल्वे स्टेशनवर फ्री वायफाय सुविधा सुरु केली आहे. या फ्री वाय फायचा 15 लाख भारतीय फायदा घेत असल्याचं गुगलनं म्हंटलं आहे. 

Updated: Jun 26, 2016, 10:21 PM IST
फुकटातल्या वायफायवर काय पाहतात पुणेकर? title=

मुंबई : गुगल आणि रेल्वेनं भारतातल्या 19 रेल्वे स्टेशनवर फ्री वायफाय सुविधा सुरु केली आहे. या फ्री वाय फायचा 15 लाख भारतीय फायदा घेत असल्याचं गुगलनं म्हंटलं आहे. याबरोबरच स्टेशनवर मिळत असलेल्या वायफाय सुविधेचा वापर लोकं कशासाठी करत आहेत, याचाही खुलासा गुगलनं केला आहे. 

फ्री वायफाय वापरणाऱ्यांमध्ये लोकांनी नोकरी शोधण्यासाठी आणि नोकरीसाठी अप्लाय करण्यासाठी वापर केला आहे. भुवनेश्वर आणि पुणे स्टेशनवर शैक्षणिक कोर्स, परीक्षेचा निकाल, सॉफ्टवेअर डाऊनलोडिंग आणि अॅप अपग्रेड करण्यासाठी वायफाय सगळ्यात जास्त प्रमाणावर वापरलं गेलं, असं गुगलनं आपल्या ब्लॉगवर म्हंटलं आहे. 

20 जूनला वर्ल्ड वायफाय डे झाला, त्यानिमित्तानं गुगलनं ही माहिती प्रसिद्ध केली आहे. जानेवारी 2016मध्ये मुंबई सेंट्रल स्टेशनवर पहिली फ्री वायफाय सुविधा सुरु झाली, त्यानंतर 18 स्टेशनवर ही वायफाय सुविधा सुरु करण्यात आली.