मुंबई : मोबाईल डेटा क्षेत्रात वाढती स्पर्धा लक्षात घेता टेलिकॉम कंपनी वोडाफोनने आपल्या सुपरनेट ४जी ग्राहकांसाठी जुन्या किंमतीत चारपट अधिक डेटा देणारे नवे प्लान लाँच केलेत.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, आधी ज्या किंमतीत १ जीबी आणि १० जीबी डेटा पॅक मिळत असे त्याच किंमतीत आता ४ जीबी आणि २२ जीबी डेटा मिळणार आहे. या पॅकची किंमत २५० रुपये आणि ९९९ रुपये आहे.
देशातील विविध सर्कलमध्ये ही नवी सेवा सुरु करण्यात आलीये. यात १५० रुपयांत १ जीबी, २५० रुपयांत ४ जीबी, ४५० रुपयांत ९ जीबी डेटा ग्राहकांना मिळणार आहे.