व्हिवोचा ड्युअल फ्रंट कॅमेरा असलेला स्मार्टफोन लॉन्च

व्हिवोनं V5 प्लस हा ड्युअल फ्रंट कॅमेरा असलेला स्मार्टफोन लॉन्च केला आहे.

Updated: Jan 23, 2017, 04:16 PM IST
व्हिवोचा ड्युअल फ्रंट कॅमेरा असलेला स्मार्टफोन लॉन्च  title=

मुंबई : व्हिवोनं V5 प्लस हा ड्युअल फ्रंट कॅमेरा असलेला स्मार्टफोन लॉन्च केला आहे. 27,980 एवढी या स्मार्टफोनची किंमत असणार आहे. ड्युअल फ्रंट कॅमेरा ही या स्मार्टफोनची युएसपी असणार आहे. 20 मेगापिक्सल आणि 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा या स्मार्टफोनला देण्यात आला आहे.

24 जानेवारीपासून या स्मार्टफोन ऑर्डर करता येणार आहे, तर 1 फेब्रुवारीपासून हा फोन ऑनलाईन आणि स्टोअर्समध्ये उपलब्ध होणार आहे.

'व्हिवो V5 प्लस'चे फिचर्स

20 मेगापिक्सल आणि 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा

16 मेगापिक्सल रेयर कॅमेरा, एलईडी फ्लॅश

2GHz ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 625 प्रोसेसर

4GB RAM

64GB इंटरनल स्टोरेज (256GB एक्सपांडेबल)

5.5 इंच HD डिस्लप्ले(1920x1080)फिंगरप्रिंट स्कॅनर

अॅन्ड्रॉईड 6.0 मार्शमेलो

4G एलटीई कॅपेबिलिटी