स्पर्शातून करा बॅटरी चार्ज!

गरज ही शोधाची जननी आहे असं म्हटलं जातं परंतू काहीजण या बाबतीत थोर शास्त्रज्ञ न्यूटनचा मार्ग अवलंबतात. एखाद्या गोष्टीचं कुतूहल जेव्हा व्यक्तीचं ध्येय बनतं तेव्हा होतो एक आविष्कार. अशाच एका कुतूहलातून मुंबईतील राजेश गुरव नावाच्या व्यक्तीनं बनवलीय एक अनोखी बॅटरी... 

Updated: Mar 15, 2016, 04:28 PM IST
स्पर्शातून करा बॅटरी चार्ज! title=

अमोल पेडणेकर, मुंबई : गरज ही शोधाची जननी आहे असं म्हटलं जातं परंतू काहीजण या बाबतीत थोर शास्त्रज्ञ न्यूटनचा मार्ग अवलंबतात. एखाद्या गोष्टीचं कुतूहल जेव्हा व्यक्तीचं ध्येय बनतं तेव्हा होतो एक आविष्कार. अशाच एका कुतूहलातून मुंबईतील राजेश गुरव नावाच्या व्यक्तीनं बनवलीय एक अनोखी बॅटरी... 

मुंबईच्या भांडूप परिसरात दहा बाय दहाच्या खोलीत राजेश गुरव राहतात. दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या राजेश यांनी एक अनोखी बॅटरी तयारी केली आहे. ही बॅटरी चार्ज करण्यासाठी वीजेची गरज लागत नाही तर व्यक्तीच्या शरीरातील उष्णता, ही बॅटरी चार्ज करण्यासाठी पुरेशी आहे. 

राजेश गुरव यांनी बनविलेल्या बॅटरीमधून चार व्होल्टची वीज निर्मिती होते. ही क्षमता वाढविण्याचा प्रयत्न आपण करत असल्याचं गुरव यांनी सांगितलंय. मानवी उष्णतेचा वापर करुन वीज निर्मिती करणाऱ्या या प्रयोगाचं पेटंट मिळविण्यासाठी सध्या राजेश प्रयत्न करत आहेत. आपलं हे संशोधन विकत घेण्यासाठी अनेक कंपन्यांनी आपल्याला ऑफर्स दिल्याचं गुरव यांनी सांगितलंय. 

कोणत्याही प्रकारचं तांत्रिक शिक्षण नसतांना राजेश गुरव यांनी ही अनोखी बॅटरी तयार केली असून त्यांच्या या प्रयत्नांना आणखी प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. समाजात असे अनेक 'फुंगसूक वँग्डू' असून त्यांची वेळीच दखल घेतल्यास अनेक रँचो जगासमोर येतील, हे नक्की