ब्रेकअप नंतरचे हे असतात लोकांचे स्टेटस

आजकाल रिलेशनशीप पेक्षा तुम्हाला ब्रेकअपची वृत्त जास्त कानावर येत असतील. सेलिब्रिटीजच्या ब्रेकअपच्या बातम्या तर आपण रोजच बघत असतो पण तुमचे मित्र-मैत्रींणींचे सुद्धा ब्रेकअपचे किस्से तुम्ही एकतच असाल.

Updated: May 31, 2016, 01:29 PM IST
ब्रेकअप नंतरचे हे असतात लोकांचे स्टेटस title=

मुंबई : आजकाल रिलेशनशीप पेक्षा तुम्हाला ब्रेकअपची वृत्त जास्त कानावर येत असतील. सेलिब्रिटीजच्या ब्रेकअपच्या बातम्या तर आपण रोजच बघत असतो पण तुमचे मित्र-मैत्रींणींचे सुद्धा ब्रेकअपचे किस्से तुम्ही एकतच असाल.
आजचे यंग जनरेशन लोकांशी बोलण्यापेक्षा सोशल मीडियावरच जास्त बोलतात. ब्रेकअप झालं की लगेच व्हॉट्सअॅपवर स्टेटस अपडेट करण्याची प्रत्येकालाच सवय लागली आहे.

तुमच्या मित्र-मैत्रींणींच्या या व्हॉट्सअॅप स्टेटसवरून तुम्हाला त्यांचे ब्रेकअप झाल्याचे लगेचच कळेल.

ब्रेकअप झाल्यानंतरचे हे सगळ्यात कॉमन स्टेटस

१. हा शेवटचं नाही जर तो हॅप्पी एन्डिंग नसेल. (if it is not happy ending then it is not an end)
२. कधीकधी एकट राहणेच चांगलं असतं निदान तुम्हाला कोणी दुखावत नाही. (soemtimes it is better to be alone... no one can hurt you)
३. मी या व्यक्तीला नाही मीस करत... मी जसा विचार केलेला ती व्यक्ती आहे तिला मी मीस करतेय. (i dont miss him, i miss who i thought he was).
४. थोडा वेळ दे, मी नक्कीच मूव्ह ऑन होईन (just give me time and i will get over you)
५. आपल्या नात्याचा शेवट नाही तर ज्या आठवणी आहेत त्या जास्त त्रास देतात. (it is not just goodbyes that hurts, it is the flashback that follow )
६. जेव्हा सगळे ठिक होईल तेव्हाच आता माझ्याशी बोल (wake me up when things are going right for once)
७. प्रेम ही माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर चूक आहे. ( love is beautiful mistake of life)