मुंबई : अनेक जण ऑफिसमधून सुट्टी घेण्यास संकोच करतात. सुट्टी घेण्याने आपले इंप्रेशन खराब होईल अशी त्यांना भिती असते. मात्र आम्ही तुम्हाला हा सल्ला देतोय की बिनधास्त ऑफिसमधून सुट्टी घ्या. स्वत:साठी, मेंदूचा थकवा दूर करण्यासाठी, पुन्हा फ्रेश होण्यासाठी.
ऑफिसमध्ये अनेकजण असे असतात की जे आजाराच्या बहाण्याने सुट्टी घेतात. मात्र तुम्हाला असे कऱण्याची गरज नाही. तुम्हाला वाटतंय आता आपल्याला एखाद्या सुट्टीची गरज आहे. तर सुट्टी घेण्यास अजिबात संकोचू नका.
न्यूयॉर्कमध्ये मार्केटिंग एक्झिक्यूटिव्ह असलेली एमी वेल आपल्या मेंटल हेल्थसाठी एक दिवसाची सुट्टी घेते. सुट्टीचे खरे कारण ती सांगत नाही. कारण यावरुन अनेक सवाल विचारले जातील. आता तुम्ही विचाराल अखेर मेंटल हेल्थसाठी सुट्टी घेणं म्हणजे नक्की काय?
ऑफिसमध्ये सुट्टी घेण्यासाठी वेगवेगळी कारणे असतात कधी कोणत्या कार्यक्रमासाठी, कधी फिरायला जाण्यासाठी तर आजारपणामुळे. मात्र यामुळे आपल्याला मानसिक शांतता मिळते का? अनेकदा तर सुट्टी घेताना खरं कारण द्याव लागतं. मात्र या अशा सुट्ट्यांमुळे तुम्ही स्वत:ला किती वेळ देता. हा 'मी टाईम' आपल्यातील क्रिएटिव्हीटी वाढवतो.
स्वत:साठी घालवलेला एक दिवस पुढील दोन आठवडे चांगले काम करण्यासाठी उर्जा देतो. सतत काम केल्याने थकवा येतो. काम कऱण्याचा कंटाळा यायला लागतो. त्यावेळी आपल्याला गरज असते ती मानसिक शांतीची.
अशावेळी स्वत:साठी एक दिवस सुट्टी घेतल्यास तुम्हाला पुन्हा काम करण्याची उर्जा मिळते. या सुट्टीच्या दिवशी तुम्ही तुम्हाला आवडेल ते करु शकता. शॉपिंग करा, झोपून संगीत ऐका नाहीतर समुद्रकिनारी फिरायला. अथवा पिक्चर वा नाटक पाहा. ज्या गोष्टीने तुम्हाला आनंद होईल ते सुट्टीच्या दिवशी करा. कारण हा तुमचा स्वत:चा हक्काचा दिवस असेल.
हे थोडंस वेगळ वाटेल मात्र करुन पाहायला काय हरकत आहे. हल्लीच्या बिझी लाईफस्टाईलमुळे स्वत:ला वेळ द्यायला पुरेसा वेळ मिळत नाही. मात्र मित्रांने जीवन एकदाच मिळते ते संपूर्ण एँजॉय करत का घालवू नये.