खिशातच मोबाईलचा स्फोट, तरूणाचा चेहरा भाजला

सुरतमध्ये मोबाईलच्या स्फोट झाल्याने, एका तरूणाच्या चेहऱ्याला तसेच हाताला जखमा झाल्या आहेत, या तरूणाचा डोळा थोडक्यात बचावला आहे, मात्र डोळ्यालाही दुखापत झाल्याचं सांगण्यात येत आहे.

Updated: Jun 30, 2015, 04:33 PM IST
खिशातच मोबाईलचा स्फोट, तरूणाचा चेहरा भाजला title=

सुरत : सुरतमध्ये मोबाईलच्या स्फोट झाल्याने, एका तरूणाच्या चेहऱ्याला तसेच हाताला जखमा झाल्या आहेत, या तरूणाचा डोळा थोडक्यात बचावला आहे, मात्र डोळ्यालाही दुखापत झाल्याचं सांगण्यात येत आहे.

भावेश ठक्कर हे पुना गाम परिसरात आपल्या मित्राकडे बसले होते, तेव्हा ही घटना घडली.

घटनेविषयी बोलतांना भावेश ठक्कर म्हणाले, 'मी शर्टच्या उजव्या खिशात मोबाईल ठेवला होता. पण अचानक त्याचा स्फोट झाला आणि त्यामुळे माझे हात आणि चेहरा भाजला, आणि स्फोटामुळे फोनचे तुकडे झाले आणि फोन काळवंडला'.

सध्या प्राथमिक उपचार करुन भावेश ठक्कर यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.