पाहा, दोन मिनिटांत स्मार्टफोन चार्ज करणारा चार्जर

आता तुमचा स्मार्टफोन सतत चार्ज करण्याच्या कटकटीपासून तुमची सुटका होऊ शकते. कारण केवळ दोन मिनिटांत तुमचा स्मार्टफोन चार्ज करणारा चार्जर लवकरच बाजारात येतोय. 

Updated: Jan 14, 2015, 09:59 AM IST
पाहा, दोन मिनिटांत स्मार्टफोन चार्ज करणारा चार्जर title=

मुंबई : आता तुमचा स्मार्टफोन सतत चार्ज करण्याच्या कटकटीपासून तुमची सुटका होऊ शकते. कारण केवळ दोन मिनिटांत तुमचा स्मार्टफोन चार्ज करणारा चार्जर लवकरच बाजारात येतोय. 

'स्टोरडॉट' या इस्त्रायली कंपनीने हा वेगवान चार्जर निर्माण केलाय. कोणत्याही स्मार्टफोनची बॅटरी केवळ दोन मिनिटांत चार्ज करण्याची क्षमता या चार्जरमध्ये आहे. नुकत्याच लास वेगासमध्ये झालेल्या 'कन्झ्युमर इलोक्ट्रॉनिक्स शो'मध्ये हा चार्जर दाखवण्यात आलाय. 

महत्त्वाचं म्हणजे, या चार्जरने चार्ज झालेला फोन केवळ पाच तास सालू राहील... पण केवळ दोन मिनिटांत जर तुमचा फोन पूर्ण चार्ज होत असेल तर तुम्ही थोडं कॉम्प्रमाईज करायला काही हरकत नाही... 

कंपनीच्या म्हणण्यानुसार, केवळ दोन मिनिटांत तुमच्या मोबाईलची बॅटरी चार्ज होते... त्यामुळे, दिवसातून दोन वेळा बॅटरी चार्ज करायला ग्राहकांना फारशी अडचण येणार नाही.

बीबीसीनं दिलेल्या माहितीनुसार, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डोरोन मायर्सडोर्फ यांच्या म्हणण्यानुसार, हा चार्जरमुळे बॅटरीमध्ये निर्माण होणारी रिअॅक्शन सामान्या बॅटरीमध्ये होणाऱ्या रिअॅक्शनपेक्षा संपूर्णपणे वेगळे होते. यामध्ये, खास पद्धतीनं तयार करण्यात आलेले कृत्रिम कार्बानिक अॅटमचा वापर करण्यात आलाय.   

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.