SHOCKING : 'फ्लिपकार्ट' वेबसाईट बंद करणार!

Myntra.com नंतर आता फ्लिपकार्टनंही आपली वेबसाईट बंद करण्याचा निर्णय घेतलाय. लवकरच ही शॉपिंग वेबसाईट केवळ मोबाईल अॅपच्या स्वरुपात ग्राहकांच्या सेवेत येणार आहे. 

Updated: Jul 7, 2015, 03:28 PM IST
SHOCKING : 'फ्लिपकार्ट' वेबसाईट बंद करणार! title=

बंगळुरू : Myntra.com नंतर आता फ्लिपकार्टनंही आपली वेबसाईट बंद करण्याचा निर्णय घेतलाय. लवकरच ही शॉपिंग वेबसाईट केवळ मोबाईल अॅपच्या स्वरुपात ग्राहकांच्या सेवेत येणार आहे. 

Myntra.com नं काही दिवसांपूर्वी घेतलेल्या या निर्णयामुळे ई-बिझनेस क्षेत्राला पहिल्यांदा धक्काच बसला होता. पण, Myntra नं घेतलेल्या या निर्णयानंतर अवघ्या दोन महिन्यांच्या आतच फ्लिपकार्टनंही त्यांच्या पायावर पाय ठेवण्याचा निर्णय घेतलाय. 

फ्लिपकार्टचा मुख्य प्रोडक्ट अधिकारी असलेल्या पुनित सोनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर महिन्यापासून फ्लिपकार्ट केवळ मोबाईल अॅपवरच काम करणार आहे.

फ्लिपकार्टचं हे पाऊल स्मार्टफोन आणि मोबाईल इंटरनेटच्या बिझनेस वाढवण्यासाठीही मोठा हातभार लावणार आहे.

सध्या फ्लिपकार्टचे ४५ दशलक्ष रजिस्टर्ड युजर्स आहेत. या वेबसाईटला दररोज जवळपास १० दशलक्ष लोक भेट देतात. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.