'सेल्फ ड्राईव्ह' कार भाड्यानं घेण्याऱ्यांसाठी खुशखबर...

सध्या सेल्फ ड्राईव्ह रेन्टल कारचा ट्रेन्ड वाढत चाललाय. या मार्केटमध्ये 'जस्ट राईड'नं मुसंडी मारण्याचा आणखी एक प्रयत्न केलाय. 

Updated: Mar 2, 2016, 01:53 PM IST
'सेल्फ ड्राईव्ह' कार भाड्यानं घेण्याऱ्यांसाठी खुशखबर... title=

मुंबई : सध्या सेल्फ ड्राईव्ह रेन्टल कारचा ट्रेन्ड वाढत चाललाय. या मार्केटमध्ये 'जस्ट राईड'नं मुसंडी मारण्याचा आणखी एक प्रयत्न केलाय. 

जस्ट राईडची नवीन ऑफर

जस्ट राईड नावाच्या वेबसाईटनं कॉर्पोरेट आणि व्यक्तींसाठी एक नवीन ऑफर सुरू केलीय. 'यूबीक' (Ubiq) नावानं ही सर्व्हिस सुरू केलीय. यामध्ये ग्राहकांना सोमवार ते शुक्रवारपर्यंत केवळ ४००० रुपयांमध्ये कार भाड्यानं मिळू शकणार आहे.

या सुविधेमुळे ज्या लोकांकडे स्वत:ची गाडी नाही आणि ड्रायव्हर घेऊ इच्छित नाहीत त्यांना फायदाच होणार आहे. https://justride.in/ या वेबसाईटवर या सुविधेविषयी अधिक माहिती मिळू शकेल.

सेल्फ ड्राईव्ह रेन्टल कारचा फंडा...

तुम्हाला कुठे फिरायला जायचं आहे पण तुमच्याकडे गाडी नाही... अशा वेळेस तुम्ही काही दिवसांकरता... किंवा काही वेळेकरता गाडी भाड्यानं घेऊ शकता. यासाठी तुम्हाला गाड्या शोधण्यासाठी भटकावं लागत नाही कारण त्यासाठीच या वेबसाईट कार्यरत आहेत.

स्पर्धेत आणखी कोण - कोण... 

या वेबसाईटवरही तुम्हाला गरजेच्या वेळी गाडी भाड्यानं मिळू शकेल.