मुंबई : साऊथ कोरियन कंपनी सॅमसंग भारतात 'मेक फॉर इंडिया' सेलिब्रेट करतेय. यासोबतच त्यांनी ग्राहकांसाठी आकर्षक ऑफरही जाहीर केल्यात.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे, सॅमसंगनं आपल्या ग्राहकांसाठी केवळ एक रुपयात स्मार्टफोन खरेदी करण्याची ऑफरही जाहीर केलीय. यामध्ये तुम्हाला सॅमसंग गॅलक्सी नोट ५ किंवा गॅलक्सी एस ६ सारखे स्मार्टफोन केवळ एक रुपयात घरी घेऊन जाण्याची संधी मिळणार आहे.
१ रुपयांना हा स्मार्टफोन विकत घेऊन उरलेले पैसे तुम्हाला पुढच्या १० हफ्त्यांत भरावे लागतील. या डीलची सुरुवात २९ एप्रिलपासून झालीय. १५ मेपर्यंत ही ऑफर सुरू राहील.