नवी दिल्लीः सॅमसंगचा बहुचर्चित स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी नोट ४ आज भारतामध्ये लॉन्च होणार आहे. काही दिवसांपूर्वी बर्लिनमध्ये सर्वात आधी आयएफए टेक शोमध्ये त्याचा डिस्प्ले केला होता. भारतात याच्या किमतीचे अंदाज काढले जात आहे. पण, अमेरिकेत या स्मार्टफोनची किंमत जवळपास ५६ हजार रुपयांपर्यंत असेल.
सॅमसंग गॅलेक्सी नोट ४चे फीचर्स
डिस्प्ले - 5.7 इंच
रिझॉल्युशन - 1440 x 2560
डिस्प्ले टाइप - सुपर ऑल्मंड
डायमेंशन - 153.5x78.6x8.5
वजन - 176 ग्राम
प्रॉसेसर - 2.7 GHZ क्वालकॉम स्नॅपड्रॅगन क्वाडकॉर
रॅम - 2GB
ऑपरेटींग सिस्टम अँन्ड्रॉईड - 4.4 टचविज
मेमरी - 32GB, 128GB वाढू शकते
बॅटरी - 3,220mAh
प्रायमरी कॅमेरा -16 मेगापिक्सल
सॅकेंडरी कॅमेरा - 3.7 मेगापिक्सल
सॅमसंग गॅलेक्सी नोट 4 हा नुकताच लॉन्च झालेला असून आयफोन-6 प्लसला तो जोरदार टक्कर देणार असल्याचं सांगितलं जातंय. भारतीय बाजारपेठेत सॅमसंगचा नोट 4 आणि अॅपल आयफोन-6 प्लस यांच्यात मोठी स्पर्धा आहे. ग्राहकांच्या पसंतीस कोणता फोन उत्तरेल हे आपल्या कळेलच.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.