सॅमसंगचा गॅलॅक्सी ए9 प्रो स्मार्टफोन लाँच

सॅमसंग या मोबाईल उत्पादक कंपनीने गॅलॅक्सी ए सिरीजमधील नवा स्मार्टफोन लाँच केलाय. 

Updated: Sep 17, 2016, 05:03 PM IST
सॅमसंगचा गॅलॅक्सी ए9 प्रो स्मार्टफोन लाँच  title=

मुंबई : सॅमसंग या मोबाईल उत्पादक कंपनीने गॅलॅक्सी ए सिरीजमधील नवा स्मार्टफोन लाँच केलाय. 

सॅमसंगने शुक्रवारी गॅलॅक्सी ए9 प्रो स्मार्टफोन लाँच केलाय. याची किंमत 32 हजार 490 इतकी आहे. 26 सप्टेंबरपासून या स्मार्टफोनची विक्री सुरु होणार आहे. 

गॅलॅक्सी ए9ची बॉडी मेटल आहे. 5 इंचाची स्क्रीन देण्यात आली असून गोरिला ग्लास 4 प्रोटेक्शन देण्यात आलंय. यात ओक्टाकोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 652 प्रोसेसर देण्यात आलाय. तसेच 4 जीबी रॅम आहे.

256 जीबी एक्सपांडेबल मेमरी आहे. यात 16 मेगापिक्सेल रेयर कॅमेरा असून 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आलाय. गोल्ड, ब्लॅक आणि व्हाईट या तीन रंगात हा स्मार्टफोन उपलब्ध आहे.