मुंबई : सोशल नेटवर्किंग साइटवर स्वतःचे फ़ोटो, माहिती, शेअर करने खूप साधी गोष्टी झाली आहे. फेसबूकवर अनेक जण स्वतःचे फोन नंबर, ईमेल आयडी, लोकेशन आणि रोजचे अपडेट टाकत असतात. पण सायबर एक्सपर्ट्स म्हणणं आहे की, कोणताही विचार न करता आपली महत्त्वाची माहिती अशा प्रकारे शेअर करणे तुमच्यासाठी नुकसानदायक ठरु शकतं.
- डेट ऑफ बर्थ
सोशल मीडियावर तुमची डेट ऑफ बर्थची माहिती यासाठी आवश्यक असते कारण त्या दिवशी तुम्हाला लोकांनी विश करावं. पण तीच डेट ऑफ़ बर्थ तुमची ओळख देखील असते. आयडेंटिफिकेशन डॉक्युमेंट्समध्ये डेट ऑफ बर्थ एक महत्त्वाची माहिती आहे. त्यामुळे डेट ऑफ बर्थ शेअर करतांना सावधान असावे.
- फोन नंबर
अनेक जण त्यांचे वैयक्तीन फोन नंबर फेसबूकवर शेअर करतात. कधी कोणाला काही तुमची गरज लागली त्यासाठी तुम्ही तो नंबर ठेवता पण तुमच्या मोबाईलचा देखील गैरवापर होऊ शकतो. 6 वर्षापूर्वी फेसबूकवर अकाऊंटसाठी ते आवश्यक होतं पण आता त्याची आवश्यकता नाही.
- लोकेशन
फेसबूकवर नेहमी लोकं प्रवाश करतांना लोकेशन शेअर करतात. याचा देखील गैरवापर होऊ शकतो. एअरपोर्ट किंवा हॉलिडेचे फोटो लोकं शेअर करतात. तुम्ही जेव्हा कोठे तरी जात असता तेव्हा तुम्ही सांगत असता की तुम्ही घरी नाही आहात. त्यामुळे याचा गैरफायदा कोणीही घेवू शकतो. त्यामुळे तुम्ही परत घरी आल्यावर देखील फोटो शेअर करु शकता.
- गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडचे फोटो
सोशल मीडियावर एक्स गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडचा फोटो असणे तुमच्या भविष्यावर प्रभाव टाकू शकतं. तुमच्या मागच्या लाईफचा नंतरच्या लाईफवर फरक पडू नये त्यासाठी फोटो काढून टाका.
- बॉस
सोशल मीडियावर तुमचा बॉस तुमच्या फ्रेंड लिस्टमध्ये असणं तुम्हाला नुकसान पोहोचवू शकतं. ट्विटरवर तुम्ही तुमच्या बॉसला फॉलो करु शकता पण फेसबूकवर असं करु नका. अशा अनेक गोष्टी झाल्या आहेत ज्यामुळे फेसबूक यूजर्सला त्यांचं मत शेअर केल्यानंतर जॉब गमवावा लागला आहे.