'रामदास' नाव घेणं विसरले आणि व्हॉट्सअॅपवर सगळ्यांना कवी 'आठवले'

रामदास आठवले अनेकांच्या चर्चेत

Updated: Jul 5, 2016, 11:09 PM IST
'रामदास' नाव घेणं विसरले आणि व्हॉट्सअॅपवर सगळ्यांना कवी 'आठवले' title=

मुंबई : रामदास आठवले आज अनेकांच्या चर्चेत होते अगदी ट्रेनमध्येही लोकं आठवलेंची चर्चा करत होते. रामदास आठवले यांनी आज सामाजिक न्याय राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. पण आज रामदास आठवले आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत होते ते म्हणजे शपथ घेतांनी ते स्वत:चं नाव घेणंच विसरले.

मग काय सोशल मीडियावर सुरु झाल्या आठवलेच्या कविता. त्यांच्या नावावर अनेक जोक्स देखील आज व्हॉट्स अॅपवर फिरत आहेत. पाहा काय होते ते जोक्स.

मंत्री पदाची शपथ घेताना नाव नाही "आठवले"!
मंत्री झालो म्हणून काय झाले.
सारं राष्ट्रपती भवन तर हसवले !!

मोदीका ढोकला, फडणवीसकी संत्री
अब भरपूर आयेगा पाऊस
मै जो बन गया मंत्री
 
काल कवी म्हणाले 
"मी मंत्री होणार हे मला कळले
म्हणून माझे पाय अमित शहांकडे वळले
 
कवी थेट राष्ट्रपती भवनातून.
मुंबई के बारीश में लोकल ट्रेन घसऱ्या.
मंत्री पद की शपथ लेते वक्त में मेरा नाम विसऱ्या...
मंत्रीपद के आनंदसे में इतना फुल्या 
मंत्रीपद के आनंदसे में इतना फुल्या 
के खुद का नावच लेने को भुल्या.