जगभरात प्रचंड व्हायरल होतोय हा गेम

काही दिवसांपासून सोशल मीडियावर Pokemon Go खूपच ट्रेंड करत आहेत. हा एक ऑगमेंटेड रिअलिटी (AR) बेस्ड मोबाईल गेम आहे. हा गेम जगभरात सध्या खूप जलदगतीने व्हायरल होतोय. हा अॅप तुम्ही व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्रामवर देखील वापरू शकता. मागच्या बुधवार हा गेम लॉन्च झाला आहे आणि याला लोकांची खूपच पसंती मिळत आहे.

Updated: Jul 13, 2016, 08:07 PM IST
जगभरात प्रचंड व्हायरल होतोय हा गेम title=

मुंबई : काही दिवसांपासून सोशल मीडियावर Pokemon Go खूपच ट्रेंड करत आहेत. हा एक ऑगमेंटेड रिअलिटी (AR) बेस्ड मोबाईल गेम आहे. हा गेम जगभरात सध्या खूप जलदगतीने व्हायरल होतोय. हा अॅप तुम्ही व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्रामवर देखील वापरू शकता. मागच्या बुधवार हा गेम लॉन्च झाला आहे आणि याला लोकांची खूपच पसंती मिळत आहे.

ऑगमेंटेड रिअॅलिटी म्हणजे या गेममध्ये वर्चुअल कॅरेक्टर तुम्हा खरोखर असल्याचे दिसतील. उदाहरण म्हणजे तुमच्या स्मार्टफोनवर तुम्हाला पोकेमॉन हा तुमच्या मोबाईलवरच असल्याचं दिसेल. दुसऱ्या मोबाईल गेमप्रमाणे हा गेम तुम्ही बसून नाही खेळू शकत. हा गेम तुम्हाला उभा राहून खेळावा लागेल. 

जगभरात हा गेम खेळण्यासाठी लोकं चालत आहेत. दोन दिवसात याची मार्केट वॅल्यू ७.५ बिलीयन डॉलरहून ही अधिक झाली आहे. अमेरिकेमध्ये ५ टक्के  अँड्रॉईड डिवाइसमध्ये हा गेम लोकांनी इंस्टॉल केला आहे. दिवसभरात लोकं हा अॅप जवळपास ४३ मिनिटं खेळतात. व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्रामहून अधिक वेळ लोकं यावर असतात.

हा गेम अजून भारतात लॉन्च झालेला नाही. तुम्ही या गेमची APK फाईल डाउनलोड करु शकता. लिंक डाऊनलोड करतांना मात्र थोडं सावधान राहा. काही हॅकर्स याचा गैरफायदा घेऊ शकता. गूगल प्ले स्टोरवर हा गेम अजून आलेला नाही. गूगलवर Pokemon Go APK टाईप करुन तुम्ही सर्च करु शकता आणि  APK Mirror लिंकवर क्लिक करा.

मोबाईलवरही तुम्हाला डाऊनलोडचं ऑप्शन मिळेल. कंप्युटरवर जर तुम्ही डाऊनलोड करत असाल तर एपीके फाईल मोबाईलमध्ये कॉपी करुन घ्या. स्मार्टफोनच्या सिक्योरिटी सेटिंग्समध्ये जाऊन 'Allow installation of apps from unknown sources'ला अॅक्टिव करुन तुम्ही इंस्टॉल करु शकता.

आपण पाहतो की, व्हॉट्सअॅप आणि मोबाईलवर व्यस्त असतांना अनेक जण अपघातांना बळी ठरतात. त्यामुळे हा खेळतांना देखील अनेक जण निष्काळजीपणे वागतील. त्यामुळे तुमच्या मुलांच्या हातात किंवा निष्काळजी असणाऱ्या लोकांनी हा गेम खेळणं धोकादायक ठरु शकतं.