रेल्वे स्टेशनवरच्या फ्री वायफायचा वापर पॉर्न पाहण्यासाठी

रेल्वे स्टेशनवर लावण्यात आलेल्या फ्री वायफायचा वापर पॉर्न पाहण्यासाठी होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Updated: Oct 17, 2016, 06:29 PM IST
रेल्वे स्टेशनवरच्या फ्री वायफायचा वापर पॉर्न पाहण्यासाठी  title=

पाटणा : रेल्वे स्टेशनवर लावण्यात आलेल्या फ्री वायफायचा वापर पॉर्न पाहण्यासाठी होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाटणा स्टेशनवर लावण्यात आलेल्या वायफायचा सर्वाधिक वापर हा पॉर्नसाठी झाला आहे.

आत्तापर्यंत भारतातल्या 23 रेल्वे स्टेशनवर फ्री वायफायची सुविधा देण्यात येत आहे. यापैकी पाटणा स्टेशनवरच वायफाय सर्वाधिक वापरण्यात येत आहे. पाटण्यानंतर जयपूर, बंगळुरू आणि दिल्ली रेल्वे स्टेशनवर सर्वाधिक वायफाय वापरला जातो.

पाटणा हे फ्री वायफाय सुविधा मिळणारं बिहारमधलं पहिलं स्टेशन आहे. पुढच्या तीन वर्षांमध्ये देशातल्या 400 स्टेशनवर फ्री वायफाय देण्यात येणार आहे.