सुपर-स्लिम स्मार्टफोन ओप्पो R5s लॉन्च!

मोबाईल निर्माता कंपनी 'ओप्पो'नं आपल्या सुपर-स्लिम स्मार्टफोन R5चं नवीन व्हर्जन R5S लॉन्च केलंय. 

Updated: Aug 25, 2015, 04:53 PM IST
सुपर-स्लिम स्मार्टफोन ओप्पो R5s लॉन्च!   title=

नवी दिल्ली : मोबाईल निर्माता कंपनी 'ओप्पो'नं आपल्या सुपर-स्लिम स्मार्टफोन R5चं नवीन व्हर्जन R5S लॉन्च केलंय. 

आजपासून हा स्मार्टफोन बाजारात उपलब्ध झालाय. या स्मार्टफोनमध्ये ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटरनल स्टोअरेज उपलब्ध आहे. तसंच या स्मार्टफोनची फ्रेम थ्रीडी वेल्डेड अॅल्युमिनिय अलॉय मटेरिअलनं बनवण्यात आलंय. 

या स्मार्टफोनची स्क्रीन ५.२ इंच आहे. तस स्क्रीन रिझोल्युशन १०८० पिक्सल आहे. कंपनीनं केलेल्या दाव्यानुसार, यामध्ये सर्वात चांगली स्क्रीन देण्यात आलीय. त्यामुळे, तुम्ही अगदी बरोबर रंग पाहू शकाल. 

ओप्पो R5S अॅन्ड्रॉईड ४.४ ऑपरेटिंग सिस्टम बेस्ड स्मार्टफोन आहे. यामध्ये १.५ गीगाहर्टझ ऑक्टाकोर कॉरटेक्स - ए ५३ प्रोसेसर देण्यात आलाय. तसंच यात  १३ मेगापिक्सलचा सोनी IMX214 सेन्सरचा रिअर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आलाय. 

या स्मार्टफोनच्या बॅटरीची क्षमता २००० मेगाहर्टझ आहे. या फोनची आणखी एक खासियत म्हणजे, या फोनमध्ये रॅपिड चार्ज टेक्निक देण्यात आलीय. तसंच फोनमध्ये निर्माण होणारी उष्णता कमी करण्यासाठी खास लिक्विड मेटलनं बनवलेलं कुलिंग एलीमेंट यामध्ये देण्यात आलंय.

ओप्पोचा हा नवीन हॅन्डसेट कंपनीच्या वेबसाईटवर १९९ युरोला (जवळपास १५,००० रुपये) उपलब्ध आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.