बॅटरी मोजून दोन मिनिटांत चार्ज होणार

अनेक जणांना फोनची बॅटरी डिस्जार्ज झाल्यानंतर संताप येतो, आता हा संताप करण्याची वेळच येणार नाही, कारण अशी बॅटरी विकसित करण्यात आली आहे, की ती बॅटरी दोन मिनिटात 65 ते 70 टक्के चार्ज होणार आहे.

Updated: Oct 21, 2014, 03:53 PM IST
बॅटरी मोजून दोन मिनिटांत चार्ज होणार title=

सिंगापूर : अनेक जणांना फोनची बॅटरी डिस्जार्ज झाल्यानंतर संताप येतो, आता हा संताप करण्याची वेळच येणार नाही, कारण अशी बॅटरी विकसित करण्यात आली आहे, की ती बॅटरी दोन मिनिटात 65 ते 70 टक्के चार्ज होणार आहे.
 
ही स्मार्ट बॅटरी सिंगापूरच्या नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी  विकसित केली आहे. चार्जिंगची प्रक्रिया जलद करण्यासाठी जेलवर आधारित सामग्रीचा वापर करण्यात आला.

 या बॅटरीत अॅनोडच्या रुपात ग्रॅफाईटच्या जागी टायटेनियम ऑक्साइडपासून बनलेल्या जेलचा वापर करण्यात आला आहे.

 हफिंगटन पोस्टने दिलेल्या बातमीनुसारर, टायटेनियम ऑक्साइडपासून बनलेला अॅनोड बॅटरीमधील रासायनिक प्रक्रिया अधिक वेगाने करतो. 

ही बॅटरी दहा हजार वेळा चार्ज होऊ शकते आणि मुख्य म्हणजे 20 वर्षांपर्यंत वापरात येणार,  येत्या दोन वर्षात ही बॅटरी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.