आता '०' आणि '९१' डायल न करता लागणार STD नंबरवर फोन

फूल मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीमध्ये (एमएनपी) येणारा मोठा अडथळा दूर करत टेलिकॉम ऑपरेटर्सनी ग्राहकांना एसटीडी नंबरच्या सुरुवातीला ० आणि +91 हे डायल करणे गरजेचं नसणार आहे. आता केवळ १० अंकी मोबाईल नंबर डायल करुनसुद्धा फोन लावला जाऊ शकतो. 

Updated: May 20, 2015, 08:10 PM IST
आता '०' आणि '९१' डायल न करता लागणार STD नंबरवर फोन title=

नवी दिल्ली: फूल मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीमध्ये (एमएनपी) येणारा मोठा अडथळा दूर करत टेलिकॉम ऑपरेटर्सनी ग्राहकांना एसटीडी नंबरच्या सुरुवातीला ० आणि +91 हे डायल करणे गरजेचं नसणार आहे. आता केवळ १० अंकी मोबाईल नंबर डायल करुनसुद्धा फोन लावला जाऊ शकतो. 

या सुविधेला अनेक नेटवर्कवर तपासण्यात आलं आहे आणि ही सुविधा विना अडथळा काम करत आहे. या सुविधेनंतर आता लवकरच देशभरात एमएनपी सुविधा लवकर सुरू होऊ शकते. आधी ही सुविधा सुरू करण्याची डेडलाईन ३ मे होती, मात्र नंतर टेलिकॉम इंडस्ट्री बॉडी सीओएआयने ही डेडलाईन दोन महिन्यानं वाढवली होती. 

फूल एमएनपीमुळे देशातील कोणत्याही भागात ग्राहकाला आपला मोबईल नंबर बदलावा लागणार नाही. सध्या ही सेवा फक्त समान टेलिकॉम सर्कलमध्ये मिळत आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.