तुमच्या घरात काय चाललंय, दिसेल मोबाईलवर...

घराच्या सुरक्षिततेसाठी लावलेले सेक्युरिटी कॅमेरे आपल्याला एखाद्या उपकरणाद्वारे जोडून सेव्ह करण्याचा त्रास आता संपणार आहे. सेक्युरिटी कॅमेरे बनवणारी नेटगिअर कंपनीनं अर्लो या नावानं हे किट बाजारात आणले असून त्याची किंमत 35000 आहे.

Updated: Jun 20, 2015, 01:45 PM IST
तुमच्या घरात काय चाललंय, दिसेल मोबाईलवर... title=

नवी दिल्ली : घराच्या सुरक्षिततेसाठी लावलेले सेक्युरिटी कॅमेरे आपल्याला एखाद्या उपकरणाद्वारे जोडून सेव्ह करण्याचा त्रास आता संपणार आहे. सेक्युरिटी कॅमेरे बनवणारी नेटगिअर कंपनीनं अर्लो या नावानं हे किट बाजारात आणले असून त्याची किंमत 35000 आहे.

या किटमध्ये दोन एचडी कॅमेरे मोशन सेन्सर्स तसेच नाईट व्हिजन कॅपेबिलिटीसह देण्यात आलेत. यासोबतच एक स्मार्ट होम बेस स्टेशन, चार मॅग्नेटिक डोम माऊंट्स तसेच दोन अतिरिकत माउंट्स, 200 एमबीचं मोफत क्लाऊड स्टोअरेजही दिलं जातंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.