नोकरीची सुवर्णसंधी, मुंबई महानगरपालिकेत भरती

 महानगरपालिका वैद्यकीय कर्मचारी निवड मंडळ सहाय्यक प्राध्यापकांची पदे नियमित तत्त्वावर भरण्यात येणार आहेत. एकूण 72 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

Updated: Aug 22, 2014, 06:11 PM IST

मुंबई : महानगरपालिका वैद्यकीय कर्मचारी निवड मंडळ सहाय्यक प्राध्यापकांची पदे नियमित तत्त्वावर भरण्यात येणार आहेत. एकूण 72 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

अ आणि ब मधील वैद्यकीय विशेष व अतिविशेषसाठी अधिष्ठता, सेठ गो, सुं. वैद्यकीय महाविद्यालय, ( केईएम. रुग्णालय) परळ, मुंबई 400012. अधिष्ठता, टो. रा. वैद्यकीय महाविद्यालय (नायर रुग्णालय) मुंबई सेंट्रल, मुंबई 28. अधिष्ठता, लो.टि.म. वैद्यकीय महाविद्यालय, सायन, मुंबई 08. तर क दंतवैद्यकीयसाठी अधिष्ठता, नायर रुग्णालय दंत महाविद्यालय, मुंबई सेंट्रल येथे अर्ज 21 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2014 पर्यंत कार्यालयीन वेळेत सकाळी 11 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत दुसरा, चौथा शनिवार आणि सुट्ट्यावगळून. आरक्षित गटासाठी 200 ते खुल्या गटासाठी 300 रुपये शुल्क रोखीने  भरल्यास अर्ज मिळेल, असे संचालक मंडळाने म्हटले आहे.

 

पालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालय, दंत महाविद्यालय आणि उपनगरीय रुग्णालयांतील खालील विषयातील 'सहाय्यक प्राध्यापक' या संवर्गातील पदे भरण्याकरिता आणि प्रतिक्षा यादी बनविण्याकरिता अर्ज मागविण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहा.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.