नवी दिल्ली : ड्रॉइड टरबो आणि नेक्सेस 6 हा हॅंडसेट लॉंच केल्यानंतर अमेरिकन कंपनी मोटोरोला आता एक मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहे. गुगलसाठी ‘नेक्सस 6’ बनवणाऱ्या मोटोरोला आता याहून मोठी झेप घ्यायचीय. ‘नेक्सस 6’हून अधिक सर्रस डिव्हाईस मोटोरोला बनवायचंय. हे नवीन डिव्हाईस म्हणजे एक टॅबलेट असेल, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. हे डिव्हाईसदेखील ड्रॉइड सीरीजचाच भाग असणार आहे.
हा नवा टॅबलेट ‘नेक्सेस 6’ शी खूप मिळता-जुळता असण्याची शक्यता आहे. याचा डिस्पले 5.9 इंच असेल. तर फोनचे इंटरनल फीचर्स नेक्सेस 6 पेक्षाही अॅडव्हान्स असतील. याचा प्रोसेसर न्यू जनरेशन क्वालकॉम स्नेपड्रगेन 810 प्रोसेसर असेल. 4 जी.बी रॅम आणि 64 बीट सीपीयू चीप या शानदार टॅबलेटमध्ये असणार आहे.
वेरिजॅान कंपनीच्या मते हा टॅबलेट पुढच्या वर्षी 2015 मध्ये ऑफिशियली लॉन्च होणार आहे. परंतु हा टॅब किती प्रकारात आणि कोणत्या व्हर्जनमध्ये लॉन्च होईल, हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.
मोटोरोला कंपनीने मोटो जी आणि मोटो जी सेकंड जनरेशन तसंच मोटो एक्स और मोटो एक्स सेकंड जनरेशनच्या रुपात चांगलाच कमबॅक केलाय. आता त्यांचा हा कमबॅक इतर कंपन्यांसाठी धोकादायक देखील ठरू शकतो असं म्हणायला हरकत नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.