येथे फ्री मध्ये मिळतोय Lumia 950 मोबाईल

अमेरिकन कंपनी माइक्रोसॉफ्ट ही नेहमी सॉफ्टवेयर आणि डिवाइसिसमुळे चर्चेत असते. माइक्रोसॉफ्टने लूमिया स्मार्टफोनला बाजारात आणलं आहे. बाजारात आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी कंपनीने लूमिया स्मार्टफोन फ्री मध्ये देण्याचा निर्णय घेतला आहे.

Updated: Apr 27, 2016, 07:40 PM IST
येथे फ्री मध्ये मिळतोय Lumia 950 मोबाईल title=

मुंबई : अमेरिकन कंपनी माइक्रोसॉफ्ट ही नेहमी सॉफ्टवेयर आणि डिवाइसिसमुळे चर्चेत असते. माइक्रोसॉफ्टने लूमिया स्मार्टफोनला बाजारात आणलं आहे. बाजारात आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी कंपनीने लूमिया स्मार्टफोन फ्री मध्ये देण्याचा निर्णय घेतला आहे.

माइक्रोसॉफ्ट कंपनीच्या स्टोरमधून Lumia 950XL जर खरेदी केला तर त्यावर एक Lumia 950 हा मोबाईल फ्रीमध्ये देणार आहे.

माइक्रोसॉफ्ट स्टोरवर 950XL हा मोबाईल 43,601 रुपयांना तर Lumia 950 ची किंमत 36,486 रुपये आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीने दिलेल्या या ऑफरमुळे कंपनी लूमिया स्मार्टफोनचा बिझनेस संपवण्याच्या विचारात असल्याचं दिसतंय. माइक्रोसॉफ्ट पुढच्या वर्षी सर्फेस स्मार्टफोन लॉन्च करणार आहे.