www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
मायक्रोमॅक्स आता कॅन्व्हास ४ बाजारात आणतय आणि कंपनीने त्यासाठी ऑनलाईन ऑर्डर घ्यायलाही सुरुवात केली आहे. हा फोन तुम्ही फक्त ५००० रुपयामध्ये बुक करु शकता.
कॅन्व्हास ४ हा आताच्या सॅमसंग गॅलक्सी एस ४, एचटीसी १, नोकिया लुमिया ९२५ आणि एलजी गुगल नॅक्सेस ४ यांना टक्कर देणारा आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार याची किंमत २३ ते २५ हजार रुपयांच्या दरम्यान असणार आहे.
कंपनीने यू – ट्युबवर टाकले काही टीजरही टाकले आहेत यावरुन तुम्हाला या फोनबद्दल पुरेशी माहिती मिळू शकते. यू – ट्युबवरील व्हिडीओ पाहूनच कळतय की हा फोन आताच्या तरुणाईला आकर्षीत करून घेईल.
या फोनमध्ये १३ मेगापिक्सल कॅमेरा, ५.५ इंचाची एचडी डिस्प्ले स्क्रिन, २ जीबी रॅम, १६ जीबी इंटरनल मेमरी, ३२ जीबी आणि एंड्राँईड ४.२.२ ऑपरेटिंग सिस्टम असल्याचेही समजतयं.
आतापर्यंत मायक्रोमॅक्सने कॅन्व्हास सिरीजमध्ये ४ फोन बाजारात आणले आहेत. यामध्ये कॅन्व्हास एचडी, कॅन्व्हास 3डी, कॅन्व्हास म्युझिक आणि कॅन्व्हास विव्हाचाही समावेश आहे. यामुळेच बाजारत या सिरिजच्या सर्व फोन्सची मागणी आपेक्षेबाहेरच राहिली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.