व्हायरल झालेल्या या व्हिडिओतून बाप्पा देतायंत महत्त्वाचा संदेश

देशात स्त्रीभृण हत्येचे प्रमाण वाढलं आहे...

Updated: Sep 8, 2016, 09:12 AM IST
व्हायरल झालेल्या या व्हिडिओतून बाप्पा देतायंत महत्त्वाचा संदेश title=

मुंबई : देशात स्त्रीभृण हत्येचे प्रमाण वाढलं आहे. आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगातही या घटना घडतायंत याचीच व्यथा आहे. आज मुली मुलांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात यशाचं एक पाऊल पुढे टाकतायंत पण तरी अनेक ठिकाणी स्त्रीभृण हत्येच्या घटना घडत आहेत.

हे प्रकार रोखण्यासाठी प्रयत्न देखील केले जातायंत... पण जो पर्यंत आपणच समजदार आणि जागृक नाही होणार तो पर्यंत हे प्रकार थांबणार नाहीत. सध्या महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी गणेशोत्सवाचा उत्साह आहे. हा उत्साह तर कायम ठेवायचाच आहे पण त्यासोबत आपली समज देखील वाढवायची आहे... असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय... त्यामध्ये बाप्पा बघा तुम्हाला काय सांगतायंत...

पाहा व्हिडिओ