अवघ्या ७,९९९ रुपयांत घ्या २४ इंचचा LED TV

L!VE नं भारतात २४ इंच आणि ३२ इंचचे दोन बजेट एलईडी टिव्ही लॉन्च केले आहेत. याची किंमत क्रमश: ७,९९९ रुपये आणि ९,९९९ रुपये आहे. कंपनीचा दावा आहे की, या रेंजमधील हे दोन मॉडल्समध्ये दुसऱ्या कंपनीच्या तुलनेत जास्त फीचर्स दिले गेलेत. 

Updated: Oct 14, 2015, 06:51 PM IST
अवघ्या ७,९९९ रुपयांत घ्या २४ इंचचा LED TV title=

मुंबई: L!VE नं भारतात २४ इंच आणि ३२ इंचचे दोन बजेट एलईडी टिव्ही लॉन्च केले आहेत. याची किंमत क्रमश: ७,९९९ रुपये आणि ९,९९९ रुपये आहे. कंपनीचा दावा आहे की, या रेंजमधील हे दोन मॉडल्समध्ये दुसऱ्या कंपनीच्या तुलनेत जास्त फीचर्स दिले गेलेत. 

आणखी वाचा - गूगलनं लॉन्च केला स्मार्टफोन नेक्सस ५ एक्स!

या एलईडी टिव्हीमध्ये दुसऱ्या महागड्या एलईडी सारखे काही खास फीचर्स आहेत. यात हाय स्पीड यूएसबी, एचडीएमआय पोर्ट आणि एव्ही मोड खास आहे.

कंपनीच्या मार्केटिंग वाइस प्रेसिडंट चेतन चेतन डिसूजानं सांगितलं, 'सध्या ग्राहकांना चांगले फीचर्स असलेल्या टिव्हीसाठी खूप पैसे मोजावे लागतात आणि स्वस्त टिव्हीत चांगले फीचर्स नसतात. आम्ही कमी पैशात चांगले फीचर्स असलेला LED TV देतोय.'

L!VE एलईडी टिव्ही देशात फक्त खास रिटेलर्सद्वारे खरेदी करता येणार आहे. कंपनी या टिव्हीसोबत एक वर्षाची वॉरंटी आणि सर्व्हिस देणार आहे. 

आणखी वाचा - बिग बिलियन डेज: १० तासांत १० लाख वस्तूंची विक्री, फ्लिपकार्टचा दावा

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.