46 तास टॉक टाइम वाला 4G स्मार्टफोन

चीनची कंपनी लिनोवोनं शक्तीशाली बॅटरी असलेला एक स्मार्टपोन p70 लॉन्च केलाय. हा फोन पी सीरिज अंतर्गत लॉन्च केलाय. याचा रिअर कॅमेरा 13 मेगापिक्सेल आहे आणि फ्रंट कॅमेरा 5 मेगापिक्सेल.

Cars | Updated: Feb 11, 2015, 05:31 PM IST
46 तास टॉक टाइम वाला 4G स्मार्टफोन title=

मुंबई: चीनची कंपनी लिनोवोनं शक्तीशाली बॅटरी असलेला एक स्मार्टपोन p70 लॉन्च केलाय. हा फोन पी सीरिज अंतर्गत लॉन्च केलाय. याचा रिअर कॅमेरा 13 मेगापिक्सेल आहे आणि फ्रंट कॅमेरा 5 मेगापिक्सेल.

हा स्मार्टफोन 1.5 जीएचझेड ऑक्टा कोर मीडिया टेक प्रोसेसर युक्त आहे. हा स्मार्टफोन '4जी'ला सपोर्ट करतो. रॅम 2 जीबी आणि 16 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. याची बॅटरी 4,000 एमएएचची आहे. कंपनीनं दावा केलाय की, हा 2G वर 46 तासांचा टॉक टाइम देईल. हा फोन सध्या चीनमध्ये लॉन्च केला गेलाय आणि भारतात लवकरच लॉन्च होण्याची शक्यता आहे. 

लिनोवो P70चे वैशिष्ट्ये -

* स्क्रीन: 5 इंच (1280x720 पिक्सेल) टच स्क्रीन डिस्पले
* प्रोसेसर: 1.5 जीएचजेड ओक्टा कोर मीडिया टेक प्रोसेसर
* रॅम: 1जीबी, 2 जीबी, 8जीबी आणि 16 जीबी इंटरनल स्टोरेज, 32 जीबी मायक्रो एसडी कार्ड
* ओएस: अँड्रॉइड 4.4 किटटकॅट
* मोटाईः 8.9 मिमी, वजन 149 ग्राम
* कॅमेराः 13 एमपी रिअर, एलईडी फ्लॅश सोबत, 5 एमपी फ्रंट
* अन्य फीचर्सः 4जी एलटीई, 3जी, वाय-फाय, ब्लूटूथ 4.0, जीपीएस
* बॅटरीः 4,000 एमएएच
* किंमतः 1339 युआन (लगभग 13,980 रुपये) 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.