नोकरीची संधी विविध क्षेत्रात ९४ जागा

 बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत उद्यान विभागात उद्यान विद्या सहाय्यक / कनिष्ठ वृक्ष अधिकारी या पदासाठी ७३ जागा

Updated: Jan 1, 2015, 05:04 PM IST
नोकरीची संधी विविध क्षेत्रात ९४ जागा title=

बीएमसी - उद्यान विद्या सहाय्यक /  कनिष्ठ वृक्ष अधिकारी 

मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत उद्यान विभागात उद्यान विद्या सहाय्यक / कनिष्ठ वृक्ष अधिकारी या पदासाठी ७३ जागा असून पदासाठी प्रवर्गानुसा १ ते १६ जानेवारी दरम्यान थेट मुलाखती घेण्यात येतील. अधिक माहिती https://www.bestundertaking/recruitments.asp वर लॉग इन करा. 

भारतीय हवाई दल - सेकंड लेफ्टनंट अधिकारी हवेत
भारतीय हवाई दलात सेकंड लेफ्टनंट अधिकारी (फ्लाइंग बॅच) सेकंड लेफ्टनंट अधिकारी (टेक्निकल बॅच), सेकंड लेफ्टनंट अधिकारी (ग्राऊंड ड्यूटी बॅच) ही पदं भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १ जानेवारी २०१५ असून अधिक माहितीसाठी - https://careerairforce.nic.in/ वर लॉग इन करा. 

माझगाव डॉक - १८ जागा
माझगाव डॉकमध्ये मुख्य व्यवस्थापक (३ जागा) व्यवस्थापक (१), उपव्यवस्थापक (२), सहाय्यक व्यवस्थापक (२), वरिष्ठ अभियंता (१०) या जागा करीता पद रिक्त आहेत. अर्जाची शेवटची तारीख १ जानेवारी २०१४. अधिक माहितीसाठी ww.mazagaondock.gov.in वर लॉग इन करा. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.