ही तरुणी १ सेकंदाला कॅल्क्युलेटरची ९ बटणं दाबते

कॅलक्युलेटरवरुन तिची बोटं अतिशय वेगानं आणि सफाईदारपणे फिरतात.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 15, 2017, 04:08 PM IST
ही तरुणी १ सेकंदाला कॅल्क्युलेटरची ९ बटणं दाबते title=

टोकिओ : जपानमध्ये सध्या एका तरुणीची चर्चा आहे. ही तरुणी एका सेकंदाला कॅल्क्युलेटरची ९ बटणं दाबते, असुका कामीमुरा असं तिचं नाव आहे. कॅलक्युलेटरवरुन तिची बोटं अतिशय वेगानं आणि सफाईदारपणे फिरतात.

 एखाद्या रोबोटलाही मागे टाकेल एवढ्या वेगानं ती कॅल्क्युलेटर वापरते. महत्त्वाचं म्हणजे इतक्या वेगानं केलेले हिशोब ती कधीच चुकवत नाही.  

असुका कामीमुरा नागासाकीमधल्या एका कंपनीत नोकरी करते.  अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर तिनं ही किमया साधलीय.  कॅलक्युलेटरचा वापर  अचूक आणि वेगानं करता यावा, यासाठी जपानमध्ये कॅलक्युलेटरने मोजणी करण्याच्या विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात.  

जपानमध्ये बरेच कॅलसी क्लब्स आहेत. शाळा सुटल्यावर मुलं तिथे कॅलक्युलेटर शिकायला जातात. तिथे सात ते आठ तास कॅल्क्युलेटर वापरण्याचा सराव केला जातो.