ह्युंदाईची नवीन कार , ट्रॅफिकमध्ये स्वत:च काढेल मार्ग

दक्षिण कोरियाची कार बनविणारी कंपनी ह्युंदाई अशी एक कार बाजारात आणत आहे, ती वाहतूक कोंडी असेल तेव्हा स्वत:च मार्ग काढेल. तसेच गतिरोधकच्यावेळी गाडीचा वेगही कमी करेल. त्यामुळे तुम्हाला ड्रायव्हिंग दरम्यान होणाऱ्या चिंतेतून सुटका मिळेल.

Updated: Apr 8, 2015, 11:26 AM IST
ह्युंदाईची नवीन कार , ट्रॅफिकमध्ये स्वत:च काढेल मार्ग title=

नवी दिल्ली : दक्षिण कोरियाची कार बनविणारी कंपनी ह्युंदाई अशी एक कार बाजारात आणत आहे, ती वाहतूक कोंडी असेल तेव्हा स्वत:च मार्ग काढेल. तसेच गतिरोधकच्यावेळी गाडीचा वेगही कमी करेल. त्यामुळे तुम्हाला ड्रायव्हिंग दरम्यान होणाऱ्या चिंतेतून सुटका मिळेल.

ही कार सेमी स्वयंचलित असणार आहे. सिओल मोटर शो प्रदर्शनाच्यावेळी ही कार मांडण्यात आली होती. आता ही कार सर्वप्रथम दक्षिण कोरिया आणि अमेरिकेत लॉन्च केली जाणार आहे. ही कार सध्या चर्चेत आहे. ह्युंदाई एकव्स या कारमध्ये सेल्फ ड्रायव्हिंग फिचर देण्यात आले आहे.

ह्युंदाईची ही कार गर्दीच्यावेळी स्वतःच नियंत्रित करेल. या कार वैशिष्ट्य म्हणजे स्पीडब्रेकरच्यावेळी गाडीची गती कमी करेल. तसेच रस्त्यावर लेनमध्ये राहण्याबाबत वेगावर नियंत्रण ठेवेल. 

या ह्युंदाई कारची किंमत ३३ ते ४३ लाख रुपये  दरम्यान असेल. ह्युंदाईची ही कार याच वर्षी सुरु बाजारात दाखल होईल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.