ह्युवेईचा नवा स्मार्टफोन लाँच

चायनीज फोन निर्माता कंपनी ह्युवेईने मोठ्या प्रतीक्षेनंतर नवा स्मार्टफोन होनोर ८ लाँच केलाय. तीन पर्यायांमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध आहे. 

Updated: Jul 13, 2016, 01:18 PM IST
ह्युवेईचा नवा स्मार्टफोन लाँच title=

मुंबई : चायनीज फोन निर्माता कंपनी ह्युवेईने मोठ्या प्रतीक्षेनंतर नवा स्मार्टफोन होनोर ८ लाँच केलाय. तीन पर्यायांमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध आहे. 

काय असेल होनोर ८ची किंमत

हा स्मार्टफोन मध्यमवर्गीयांच्या खिशाला परवडेल इतक्या किंमतीचा ठेवण्यात येणार आहे. ३२ जीबी स्टोरेज आणि ३ जीबी रॅमच्या फोनची किंमत भारतीय बाजारात साधारण २० हजार रुपये ठेवण्यात आली आहे. 

त्याचप्रमाणे ३२ जीबी स्टोरेज आणि ४ जीबी रॅमच्या फोनची किंमत २३ हजार रुपये असेल. ६४ जीबी आणि ४ जीबी रॅमच्या स्मार्टफोनची किंमत २५ हजार असू शकेल.

हे आहेत फीचर्स

या फोनचे खास वैशिष्ट्य म्हणजे यात १२ मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आलाय. तसेत ५.२ इंचाची फुल एचडी स्क्रीन आहे. यात १.८ गिगाहर्टझ किरीन ९५० प्रोसेसर आहे.