बीजिंग : चीनची 'हुवेई' या मोबाईल निर्माता कंपनीनं 'सुपरफोन'ची घोषणा केलीय.
'नेक्स्ट जनरेशन फोन' म्हणून सुपरफोनकडे पाहिलं जातंय. हा फोन २०२० मध्ये लॉन्च होऊ शकतो. मोबाईलचा वापर आणि मोबाईलकडे पाहण्याचा संपूर्ण दृष्टीकोनच हा सुपरफोन बदलून टाकेन, असा विश्वास कंपनीला वाटतोय.
भौतिक आणि डिजिटल जग एकाच ठिकाणी आणण्याची शक्ती या 'सुपरफोन'मध्ये असेल, असा दावा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केलाय.
आपला या महत्त्वकांक्षी प्रोजेक्टसाठी 'हुवेई'नं फोल्कवॅगन, मर्सिडिज बेंझ, ऑडी यांसारख्या ऑटोमोबाईल ब्रॅन्डसोबतही हातमिळवणी केलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.