मुंबई : HTCने आपला नवा नेक्स्ट जेनरेशन फ्लैगशिप HTC-10 जागतिक बाजारात लॉन्च केलाय. कंपनीही हा स्मार्टफोन भारतात लवकरच लॉन्च करणार आहे.
मात्र, कंपनीने HTC-10ला ग्लोबल लॉन्च केलाय. त्याचबरोबर कंपनीने दुसरा वॅरिएंट HTC Lifestyle हाही लॉन्च केलाय. मात्र, HTC-10 पेक्षा यात थोडी कमी आहे. नवा ढासू स्मार्टफोन लॉन्च केल्यानंतर असेही वृत्त आहे की, HTC-10हा भारतात लॉन्च न होता दुसरी आवृत्ती येणार आहे.
HTCने आपल्या ग्राहकांना नाराज केलेय. कंपनीने याआधी भारतात HTC-10 लॉन्च करण्याची घोषणा केली होती. HTCचे दक्षिण आशियाई अध्यक्ष फैसल सिद्दिकी यांनी सांगितले, ग्लोबल फ्लैगशिप HTC-10 लवकच भारतात येईल. आम्ही यासाठी खूप उत्साही आहोत.
HTC-10 ग्लोबल लॉन्च केल्यानंतर कंपनीची भारतीय वेबसाईटवर याचे दुसरे व्हर्जन HTC Lifestyle दिसत होता. मात्र, नवा स्मार्टफोन लॉन्च केल्यानंतर हा फोन कंपनीने साईटवरुन हटवलाय.
- ५.२ इंच क्वाड एचडी सूपर एलसीडी ५ डिस्प्ले आहे.
- यात क्वॉलकॉम स्नॅपड्रेगन ८२० प्रोसेरसबरोबर ४ जीबी रॅम
- याची इंटरनल मेमरी ३२/६४ जीबी आहे.
- मायक्रो एसटी कार्डच्या माध्यमातून २ टीबी पर्यंत वाढवू शकता
- हा स्मार्टफोन ६.० मार्शमेलो सिस्टिमवर चालेल
- यूजरच्या इंटरफेस सेंस ७ वर तो चालेल
- १२ मेगापिक्सल कॅमेरा आणि सेल्फी कॅमेरा ५ मेगापिक्सल
- कॅमेऱ्यात अनेक सुविधा देण्यात आल्यात
- ४ केपर्यंत व्हीडियो रेकॉर्डिंग करु शकता
- बॅटरी क्षमता ३,००० एमएएच असून सलग ३० मिनिटांत ५० टक्के ती चार्ज होऊ शकते.
- यात ३ जीबी रॅम आहे.
- यात क्वॉलकॉम स्नॅपड्रेगन ६५०० प्रोसेरसबरोबर३ जीबी रॅम
- इंटरनल ३२ जीबी मेमरी आहे.
- मायक्रो एसडी कार्डच्या माध्यमातून मेमरी वाढवू शकता.
- HTC-10 प्रमाणे स्पेसिफिकेशन आहेत.