फर्निचरवरील ओरखडे घालवण्याचा सोपा उपाय

घरामध्ये लाकडाचा वापर ही फार पूर्वीपासून केला जातो. राजेमहाराजांच्या काळात लाकडी फर्निचरवर मोठ्या प्रमाणात नक्षीकाम केले जात असे. आता तसे नसले तरी लाकडाचाच उपयोग करून पण सुटसुटीत, वजनाला हलके असे फर्निचर तयार केले जाते. 

Updated: May 10, 2016, 09:49 AM IST
फर्निचरवरील ओरखडे घालवण्याचा सोपा उपाय title=

मुंबई : घरामध्ये लाकडाचा वापर ही फार पूर्वीपासून केला जातो. राजेमहाराजांच्या काळात लाकडी फर्निचरवर मोठ्या प्रमाणात नक्षीकाम केले जात असे. आता तसे नसले तरी लाकडाचाच उपयोग करून पण सुटसुटीत, वजनाला हलके असे फर्निचर तयार केले जाते. 

मात्र अशा फर्निचरची विशेष काळजीही घ्यावी लागते. अनेकदा टेबल अथवा लाकडाच्या फर्निचरवर लहानसहान ओरखडे पडतात. अशा ओरखड्यांमुळे फर्निचर खराब दिसू लागते.

यावर सर्वात सोपा उपाय म्हणून तुम्ही हे ओरखडे घालवण्यासाठी अक्रोडचा वापर करु शकता. त्या ओरखडयांवर अक्रोड फिरवल्यास त्या खुणा निघून जातात.