मुंबई : मान्सून सर्वत्र दाखल झालाय. यंदाचा मान्सून जरा उशिराच आला मात्र तो आता जोरदार बरसतोय. ही सुखावणारी बातमी असली तरी पावसाळ्यात विशेषकरुन स्मार्टफोनची काळजी घेण्याची गरज असते. पावसात फोन भिजून तो बंद होण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसात स्मार्टफोनची काळजी घेण्यासाठी खास टिप्स
नेहमी पाऊच अथवा झिपलॉक जवळ ठेवा
पावसाळ्यात हातात फोन ठेवता येत नाही. तो भिजण्याची शक्यता असते त्यामुळे नेहमी जवळ छोटा पाऊच अथवा झिपलॉक बाळगा. यात तुमचा फोन सुरक्षित राहील.
फोन हातात घेऊन उगाच पावसात फिरु नका
फोन हातात घेऊन उगाच पावसात फिरणे कटाक्षाने टाळा.
वॉटरप्रूफ कव्हरचा वापर
पावसाळ्यात खास स्मार्टफोनलाठी वॉटरप्रूफ कव्हर्स बाजारात येतात. यांचाही तुम्ही वापर करु शकता.
ब्लूटूथचा वापर करु शकता.
पावसात चालताना अनेकदा फोन आल्यास तो घेता येत नाही. यावेळी तुम्ही ब्लूटूथचा वापर करु शकता.
वॉटरप्रूफ स्मार्टफोनला प्राधान्य
वॉटरप्रूफ साधने वापरण्यापेक्षा वॉटरप्रूफ स्मार्टफोनला प्राधान्य द्या. यामुळे पावसाळ्यात तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागणार नाही.