मुंबई : सध्याच्या फास्ट जगात रोख रकमेने व्यवहार करण्याऐवजी क्रेडिट कार्डद्वारे व्यवहार करण्याकडे लोकांचा कल वाढत आहे. क्रेडिट कार्डद्वारे बऱ्याच सुविधा मिळतात. मात्र छोट्याशा चुकीने तुम्हाला मोठा भुर्दंड पडू शकतो. त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरतांना काही बारिकसारिक गोष्टींवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. आम्ही तुम्हाला अशा टीप्स देणार आहोत, ज्यामुळे क्रेडिट कार्डबाबत होणाऱ्या फसवणुकीपासून तुम्ही वाचू शकता.
फसवणुकीपासून वाचण्यासाठी हे करा -:
१) आपल्या क्रेडिट कार्डचा वापर करतेवेळी सर्वात आधी वेबसाइडवर लक्ष देणे गरजेचे आहे. क्रेडिट कार्डद्वारे ऑनलाइन व्यवहार करतेवेळी लक्षात ठेवा की, त्याच वेबसाइडवर असे व्यवहार करा ज्याची सुरूवात httpsने झालेली असेल.
२) जर तुम्हाला क्रेडिट कार्डची फोटो कॉपी कोणाला द्यायची असेल, तर फोटो कॉपी दोन्ही बाजूंची देऊ नये. कारण ऑनलाइन ट्रांजॅक्शन करते वेळी गरजेचा असलेला कार्ड वेरिफिकेशन वॅल्यु कार्डच्या मागच्या बाजूला छापलेला असतो. त्याचा गैरवापर टाळण्यासाठी क्रेडिट कार्डची फोटो कॉपी दोन्ही बाजूंची देऊ नये.
३) आजकाल क्रेडिट कार्डबाबत धोकेबाजी फोनद्वारे जास्त होते. फोनवरून अनेक आकर्षक ऑफर देऊन अकाऊंट डिटेल टेलिमार्केटिंग करणाऱ्या कंपन्या ग्राहकांकडून मागतात. अशा टेलिमार्केटिंग कंपनींना अकाऊंट डिटेल चुकुनही देऊ नये.
४) ऑनलाइन ट्रांजॅक्शन करते वेळी वेबसाइडच्या लिंकवर लक्ष ठेवा. त्याच वेबसाइडवर ट्रांजॅक्शन करा ज्याच्या लिंकच्या उजव्या बाजूला कुलुपाचं चिंन्ह असेल. जर तसं नसेल तर व्यवहार करणे टाळावे.
५) विनाकरण क्रेडिटचं लिमिट वाढवू नये. जर तुमचं क्रेडिट कार्ड लिमिट जास्त आहे तर, त्याचा उपयोग ऑनलाइन ट्रांजॅक्शनसाठी जास्त करू नये. कारण त्यामुळे तुमचं क्रेडिट जास्त असल्याचे उघड होते आणि अप्रत्यक्ष धोका वाढतो.
६) क्रेडिट कार्डचा वापर ऑनलाइन ट्रांन्झॅक्शन जास्त करू नये. त्याऐवजी व्हर्चुअल क्रेडिट कार्डचा वापर करावा.
७) रेस्टॉरंन्ट अथवा हॉटेलमध्ये गेल्यास क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करत असल्यास पेमेंट नजरेसमोरच करावं. वेडरकडे क्रेडिट कार्ड देऊन पेमेंट करू नये.
८) तुम्ही तुमच्या कार्डमध्ये चिप किंवा पिन कोड टाकू शकता. जर पिन नंबर नसेल तर तो टाकून घ्यावा. पिन नंबर कोणासोबत शेअर करू नये. याचा उपयोग असा होईल की, कार्ड कोणाच्या हाती लागलं तरी त्याचा गैरवापर करणे शक्य होणार नाही.
९) कार्डच्या मागील सीवीवी नंबर आपल्या जवळ लिहून ठेवावा. त्यानंतर कार्डवरील सीवीवी नंबर खोडून टाकावा. त्यामुळे कार्ड हरवल्यास त्याचा गैरवापर करणे शक्य होणार नाही.
१०) जर क्रेडिट कार्ड किंवा डेबि़ट कार्डचे स्टेटमेंट वेळेवर मिळत नसतील तर त्याची माहिती तात्काळ बॅंकेला द्यावी. तसेच बॅंकेचे स्टेटमेंट, क्रेडिट कार्ड बिल बारिक फाडून फेकून द्यावे. कारण हे चुकिच्या व्यक्तीच्या हाती लागल्यास त्याचा गैरवापर होऊ शकतो.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.