नवी दिल्ली : गोंधळून जाऊ नका, ही बातमी पूर्णपणे निराधार आहे, सोशल नेटवर्किंगवर हा खोडसाडपणा करण्यात आला आहे, कारण हे ऐकून तुम्हाला नक्की आश्चर्य होणार आहे की, पंधरा दिवसांसाठी ग्रहणाच्या वेळी होतो तसा पृथ्वीवर अंधार होणार आहे.
हे सांगून आम्ही तुम्हाला घाबरवू इच्छीत नाहीत, कारण ही माहिती त्या आधी नीट वाचा. कारण ही बातमी आम्ही दिलेली नाही, सोशल नेटवर्किंगवर अशा अफवा पसरवल्या जात आहेत.
यात दिलेल्या माहितीत असं म्हटलं आहे, १५ नोव्हेंबर २०१५ आणि २९ नोव्हेंबर २०१५ पर्यंत संपूर्ण पृथ्वी अंधारात बुडणार आहे.अमेरिकेच्या नासाने ही माहिती दिली आहे, १ मिलियन वर्षानंतर अशी घटना घडणार आहे. रविवार १५ नोव्हेंबर २०१५ दुपारी ३ पासून सोमवार ३० नोव्हेंबर २०१५ पर्यंत अंधार कायम असणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.